'आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान'
राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान मार्फत मुंबई येथे एक दिवसीय राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर, 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर, उद्योजक दिपक घैसास, 'ए बी पी माझा'च्या शेफाली साधू, या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात मीनल मोहाडीकर यांनी संस्थेची माहिती व ओळख करुन दिली.
गेल्या 19 वर्षापासून आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान ही संस्था महिलांना विनामूल्य उद्योग मार्गदर्शन करत आहे. तसेच राज्यातील उद्योजक महिलांना आम्ही उद्योगिनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करीत असते. या परिषदेत यशस्वी उद्योजिकांची वाटचाल, जडण घडण, शासकीय योजना यासंबंधी विविध सत्रात देण्यात आलेल्या माहितीचा संपूर्ण महाराष्टातून परिषदेला उपस्थित असणाऱ्या 800 हून अधिक उद्योजिकांनी लाभ घेतला.
पहिल्या सत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला व 'शासकीय योजना' या विषयावर के व्ही आय सी.च्या प्रज्ञा जोगळेकर, भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या प्रमुख वर्षा तावडे, अमृतयात्राचे नवीन काळे, दुबईमधील उद्योजिका शिल्पा कुलकणी - मोहीते यांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात 'मी कशी घडले? या विषयावर प्रगती प्रतिष्ठान- जव्हार येथील सुनंदा पटवर्धन, ब्रॅण्डगुरु जान्हवी राऊळ, जेनेटीक सेंटर डॉ. साधना घैसास, गोवा येथील उद्योजिका सुचिता मळकर्णेकर, महिला पायलट आदिती परांजपे यांनी अनुभवकथन केले. सायंकाळी आम्ही उद्योगिनी गौरव पुरस्काराचे वितरण आयुष व पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक आणि अर्थ व नियोजन ग्राम विकास मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. एम. ई. डी. सी.चे अध्यक्ष कमांडर दीपक नाईक, सारस्वत बॅंकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर, पी. एन. गाडगीळ ऍण्ड़ सन्सच्या पार्टनर रेणू गाडगीळ यांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा मोडक व दुहीता सोमण यांनी केले.
आम्ही उद्योगिनी गौरव पुरस्काराचे मानकरी
डॉ. साधना घैसास- मुंबई विभाग
पद्मजा लाखे - पश्चिम महाराष्ट्र विभाग
डॉ.ज्योती दाशरथी मराठवाडा विभाग
मिनाक्षी निकम- उत्तर महाराष्ट्र विभाग
मिलन राणे- कोकण विभाग
निलिमा दिवटे -विदर्भ विभाग
विशेष पुरस्कार अनुराधा प्रभुदेसाई, लक्ष्य फाऊंडेशन व सुनंदा पटवर्धन,प्रगती प्रतिष्ठान
विशेष पत्रकारीता पुरस्कार
प्रगती बाणखेले (महाराष्ट्र टाइम्स) व मनिषा सुभेदार (दै.तरुण भारत)