MACCIA तर्फे महिला उद्योजिकांचा आनंदोत्सव

DSC 0271महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर या संस्थेच्या महिला विभागातर्फे २९ मार्च रोजी मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला उद्योजिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा विषय होता 'SALUTE WOMEN WHO HAVE SO MANY REASONS TO BE HAPPY!'. यामध्ये आनंदी राहण्याची विविध कारणं आणि संधी शोधत आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना आमंत्रित करण्यात आले होते.

महिला विभागाच्या अध्यक्षा शुभांगी तिरोडकर यांनी आपल्या प्रास्ताविकात ’स्वत:कडे दुर्लक्ष करून आनंदी असल्याचं खोटं चित्र जगाला दाखवू नका तसेच Criticism, Complaining & Comparison या ३ 'C' पासून नेहमी दूर राहा.’असा सल्ला उपस्थितांना दिला. २५ वर्षे MACCIAच्या महिला विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या माजी अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी आपल्या मनोगतात चांगली माणसं जोडणं हा उद्योगाचा मूलमंत्र असल्याचे सांगत अनेक यशस्वी उद्योजिकांचे दाखले दिले. त्याचप्रमाणे शासनाच्या आगामी महिला धोरणाचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी MSME च्या डेटाबॅंकमध्ये नोंदणी करणे व उद्योग-आधार कार्ड बनवून घेणे याची गरज पटवून दिली.

DSC 0259या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या निवडणुक आयोगाच्या माजी आयुक्त व प्रशासकीय अधिकारी नीला सत्यनारायण यांनी आपल्या भाषणात दुसऱ्याला आनंद देऊन समृद्धी मिळवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यादेखील कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. महिलांच्या अनेक प्रश्नांना हाताळताना त्यांना आलेले विलक्षण अनुभव व त्यातून काढलेले मार्ग यांना उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. अॅसिड हल्ल्यामुळे आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या १५ पिडितांना करण्यात आलेली वैद्यकीय मदत व त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मिळवलेल्या रोजगार संधी याविषयीची माहिती त्यांनी दिली. माबिया विश्वास या पिडीत तरूणीने या कार्यक्रमाला हजर राहून आपली कहाणी कथन केली.

याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या एका सत्रात सुप्रसिद्ध गायिका व ’पिझ्झा बॉक्स’च्या संचालिका वैशाली सामंत, ब्रायडल मेकअप स्टुडिओ आणि DSC 0257’प्रथा’या साडी ब्रॅंडच्या कविता कोपरकर,Young Mind Educational Solutions & Consultancy च्या नंदिता कोहोक, ’अर्थिता’च्या डॉ.अंजली तायडे या विविध क्षेत्रातल्या उद्योगिनींनी आपापली वाटचाल आणि आनंदाच्या कल्पना याविषयी मनोगत मांडले. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात वीरमाता अनुराधा गोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव करून देण्याची गरज आणि सैन्यदलासंबंधी सर्वसामान्यांमध्ये दिसणारी अनास्था याविषयीचे विचार मांडले. ”कनेक्ट’या तरुणांच्या म्युझिकल ग्रुपने आफ्रिकन ड्रमच्या तालावर सर्व उपस्थितांना सामिल करत ताणतणावापासून मुक्ती देणाऱ्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division