'बिझकॉन' 2017आणि बृहन्महाराष्ट्र मंडळ अमेरिका, 18 वे अधिवेशन

Bizconमायभूमी आणि मायभाषा- संस्कृतीशी असलेले बंध भक्कम करण्याच्या उद्देशाने उत्तर अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या मराठी माणसांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली. बदलत्या काळाच्या ओघात मंडळाने आपली दिशा बदलली असून आता मायदेशातल्या नव-उद्योजकांना उत्तर अमेरिकेतील उद्योगविश्वाशी जोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. BMM २०१७ बृहन्महाराष्ट्र मंडळाचे यंदाचे, १८वे अधिवेशन भरत आहे महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉइट (MMD) येथे जुलै २०१७ मध्ये. केवळ नॉर्थ अमेरिकेतल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी बांधवांचा पाहुणचार करण्यास हे मंडळ उत्सुक आहे. एवढं मोठं अधिवेशन करायचं म्हणजे सोपं काम नाही. पण डेट्रॉइटच्या माणसांनी दाखवलेली कष्टाची तयारी, इतर मंडळांनी दाखवलेला विश्वास आणि देऊ केलेला मदतीचा हात, ह्या जोरावर हे शिवधनुष्य पेलण्यास सर्वजण सज्ज होत आहेत.

हे अधिवेशन अमेरिकेच्या मिशीगन प्रांतातील ग्रॅण्डरॅपिडस येथे 6 जुलै ते 9 जुलै 2017 या दरम्यान होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एक विशेष बिझिनेस कॉन्फरन्स (बिझकॉन) आयोजित करण्यात आली असून उद्योजक, उद्योग-व्यापारी संस्थांचे प्रतिनिधी आणि व्यावसायिकांना परस्पर संपर्कासह बदलत्या वातावरणाला पूरक अशी नवी तंत्रे आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. दिनांक 6 जुलै रोजी होणार्या या पूर्ण दिवसीय चर्चासत्रासाठी नोंदणी सुरू असून महाराष्ट्रातील उद्योजकांना यात सहभागी होऊन उत्तर अमेरिकेतील समव्यावसायिक, भांडवलदारांशी संपर्क साधता येईल.

‘इन्टेलिजन्टमोबिलिटी’हे या बिझकॉनचे प्रमुख सूत्र असून इंटरनेटमुळे वाढते संपर्कजाळे, जगभरात वाढणारे नागरीकरण, त्यातून होणारे सामाजिक बदल आणि या साऱ्याचा उद्योगातील संधी-आव्हाने व शक्यतांवर होणारा परिणाम यावर या परिषदेत अनुभवकथन व विचारमंथन होईल. त्यासाठी उपस्थित तज्ञांमध्ये अमेरिकेतील उद्योजक, तेथील विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमधील अभ्यासक, शासनसंस्थांचे पदाधिकारी तसेच वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी यांचा सहभाग असेल.

हे सत्र तीन भागांमध्ये विभागण्यात आले आहे.

‘बीटूबी’ या भागात महाराष्ट्रातील उद्योजकांना उत्तर अमेरिकेतील संबंधीत कंपन्या-उद्योगांशी थेट संपर्क तसेच नेटवर्किंगची संधी मिळेल. त्यातून भविष्यातील ‘पार्टनरशीप्स’ची पायाभरणी व्हावी अशी अपेक्षा आहे. अमेरिकन भांडवलदारांकडून भांडवलपुरवठ्याच्या शक्यता पडताळणे, संभाव्य भागीदारीच्या चर्चा याला या सत्रात उत्तेजन दिले जाईल.

‘बीएमएम शिफ्टिंगगिअर’ या सत्रात आपला सद्य उद्योग- व्यवसाय अगर नोकरीत बदल शोधणाऱ्यांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न असेल. अशा पध्दतीने ‘बदला’चे नियोजन करून तो यशस्वीपणे अंमलात आणणारे अमेरिकन आणि भारतीय उद्योजक-व्यावसायिक या सत्रात मार्गदर्शन करतील. या प्रवासासाठी अत्यावश्यक तंत्र-मंत्राचे प्रशिक्षण देणारी चर्चासत्रे हे या सत्राचे वैशिष्ट्य असेल.

तंत्रज्ञानाशी निगडीत असणारी नवनिर्मिती आणि नवोद्योजक यांना एका मंचावर आणून त्यांच्या वाटचालीला दिशा, भांडवल तसेच संधी पुरवणारे तिसरे सत्र ‘ आन्त्रप्रुनरएम्पॉवर्ड’ या नावाने आयोजित करण्यात आले असून त्यात बिझिनेसमॉडेल्स, भांडवल उभारणी, विपणन अशा सर्व विषयांवर चर्चा-मार्गदर्शन केले जाईल.

‘पर्सिसण्ट’चे संस्थापक आनंद देशपांडे, एलजी केमिकल्सचे प्रभाकर पाटील, व्हिस्टॉनचे प्रमुख सचिन लवंदे यांच्यासह अमेरिकेतील मान्यवर या सत्रांमध्ये मार्गदर्शन करतील. त्यामध्ये अमेरिकन सेंटर फॉर मोबिलिटीचे अध्यक्ष जॉन मॅडॉक्स, इंटरेटेकचे संचालक राल्फबकिंगहॅम, ख्यातनाम लेखक रॉबर्ट पॅसिक, इओएस या प्रणालीचे तज्ञ केवीनसबॉस्की, सेनसईच्या संचालक डायानावॉंग, मिशिगन स्मॉलबिझिनेस डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक कीथब्रॉफी आदिंचा समावेश आहे.

बीएमएमचे अठरावे अधिवेशन सात जुलैपासून सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित या बिझकॉनसाठीची नोंदणी आणि अधिक माहिती https://www.bmm2017.org/index.php/business-conference येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी बीएमएमच्या प्रतिनिधी मंडळातील बिझकॉनचे संयोजक भूषण कुलकर्णी (This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. ) यांच्याशी संपर्क साधता येईल.
Website: http://www.bmm2017.org 

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division