महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सहाय्य केंद्र

maharashtra industryमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१६-१७ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...

ऑगस्ट १९९१ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी ४७६ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यामधील गुंतवणूक सर्वात जास्त रु. ३,८७,४३३ कोटी (एकूण गुंतवणुकीच्या ३४.१ टक्के) आहे, त्या पाठोपाठ इंधन आणि धातू उद्योगामध्ये अनुक्रमे रु. १,४२,७६० कोटी (१२.५ टक्के) व रु. १,०१,३५४ कोटी (८.९ टक्के) गुंतवणूक आहे. एकूण मंजूर गुंतवणुकीपैकी सुमारे ५५.५ टक्के गुंतवणूक या तीन उद्योग गटांमध्ये आहे. उद्योग गटनिहाय राज्यातील मंजूर व कार्यान्वित प्रकल्पांची माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
may 1सन २०१५-१६ मध्ये रु. ३०,५८० कोटी गुंतवणुकीच्या व ०.३ लाख प्रस्तावित रोजगार निर्मितीच्या ३४० प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. सन २०१६-१७ मध्ये नोव्हेंबरपर्यंत रु. २८,६२५ कोटी गुंतवणुकीच्या व अंदाजे ०.२ लाख रोजगार निर्मितीच्या २६२ प्रकल्पांची नोंदणी झाली आणि रु. २,३६१ कोटी गुंतवणुकीचे २२ प्रकल्प कार्यान्वित झाले.

राज्याने रोजगार निर्मितीची सर्वाधिक क्षमता असलेले सर्वात जास्त औद्योगिक प्रस्ताव प्राप्त केले आहेत. ऑगस्ट १९९१ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत एकूण रु. ११,३७,७८३ कोटी गुंतवणुकीच्या १९,४३७ औद्योगिक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यापैकी रु. २,६९,८१४ कोटी गुंतवणुकीचे (२३.७ टक्के) व सुमारे ११.४५ लाख प्रस्तावित रोजगार निर्मितीचे ८,६६४ प्रकल्प (४४.६ टक्के) कार्यान्वित झाले आहेत, तर रु. ८७,७०१ कोटी गुंतवणुकीच्या २,१०७ प्रकल्पांचे काम सुरु असून त्यामधून २.९८ लाख रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. देशामध्ये प्राप्त झालेल्या एकूण औद्योगिक प्रस्ताव आणि गुंतवणुकीमध्ये राज्याचा अनुक्रमे १७.९ टक्के आणि १० टक्के वाटा आहे. मंजूर औद्योगिक प्रस्तावांची राज्यनिहाय माहिती खालील तक्त्यामध्ये देण्यात आलेली आहे.

may 2

मोठ्या प्रकल्पांमधील गुंतवणूक

राज्यात २००५ पासून मोठ्या प्रकल्पांबाबतचे धोरण राबविण्यात येत आहे. राज्यामध्ये सुरुवातीपासून डिसेंबर २०१६ पर्यंत रु. ३,७९,५६१ कोटी गुंतवणुकीच्या ४.२ लाख प्रस्तावित रोजगार निर्मितीच्या ४८८ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यापैकी रु. ६५,८१७ कोटी प्रत्यक्ष गुंतवणूक व सुमारे एक लाख प्रस्तावित रोजगार निर्मितीच्या १५७ प्रकल्पांना पात्रता प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division