स्वतःमधील उद्योजकतेला पैलू पाडण्याची उत्कृष्टसंधी

पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन आंत्रप्रेन्युअरशिप (पीजीपी- आंत्रप्रेन्युअरशिप)

weschoo logoशिक्षण प्रसारक मंडळींच्या प्रिएल. एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (WeSchool) तर्फे पोस्ट-ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन आंत्रप्रेन्युअरशिप (पीजीपी- आंत्रप्रेन्युअरशिप) या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांसाठी उत्कृष्टसंधी.

अंगीभूत उद्योजकतेच्या बीजांचा विकास करून, यशस्वी व्यावसायिक घडवणारा भारतातला हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. ११ महिने कालावधीच्या, दोन सत्रांमध्ये विभागलेल्या, अर्धवेळाच्या अभ्यासक्रमाची रचना 'AAA- Acquisition, Application & Assimilation' या त्रिसूत्रीवर आधारित असून, याचा आराखडा हॉवर्ड बिझनेसस्कूलच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर आखण्यात आला आहे हे विशेष. अतिरिक्त गुंतवणुकीचा भार वाढवल्याशिवाय व्यवसायाचे व्यवस्थापन आणि विकास करत नफ्याचे प्रमाण कसे वाढवता येईल, नव्या व्यावसायिक प्रक्रिया कशा शोधायच्या हे या अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार आहे, एवढेच नव्हे, तर व्यवसायाच्या जास्तीत जास्त विकासासाठी संधी कशी शोधाव्यात आणि त्याचा वापर कसा करावा याचे मार्ग दाखवण्यात येतील. व्यवसाय करण्याचे नवा दृष्टीकोन मिळाल्यामुळे जुने पायंडे मोडून, नवे काही करू इच्छिणाऱ्या तरुण व्यावसायिकांसाठी हा अभ्यासक्रम चांगलाच उपयुक्त ठरेल.

हा अभ्यासक्रम कुणासाठी पहिल्या- दुसऱ्या- तिसऱ्या पिढीचे उद्योजक आणि उत्पादक, ट्रेडिंग, किरकोळ विक्री, कपडा, सुवर्णालंकार- रत्ने- आभूषणे, हॉटेल, पर्यटन, वाहतूक, निर्यात, प्रसारमाध्यमे, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रातले लघु आणि मध्यम श्रेणीचे उद्योजक यांच्यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे. शिवाय उद्योजकतेची आसमनात असणारे तरुण पदवीधर, व्यवसाय करणाऱ्या महिला, व्यवसायात फेरबदल आणू पाहणारे यांच्यासाठीही हा अभ्यासक्रम महत्वाचा ठरेल.

पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातील कुठल्याही शाखेतील पदवीधर, व्यवसाय चालवत असलेले किंवा कौटुंबिक व्यवसायातील सक्रीय सदस्य. कौटुंबिक व्यवसायात कार्यरत महिलांचे स्वागत.

ठळक वैशिष्ट्ये

• एमबीए धर्तीचा अभ्यासक्रम असला तरी या अभ्यासक्रमासाठी प्रवेशपरीक्षा देण्याचा ताण नाही.
• या अभ्यासक्रमाची लेक्चर्स महिन्यातून फक्त एक आठवडा घेतली जातात, प्रवेश घेणाऱ्या व्यावसायिक विद्यार्थ्यांचे मूळ व्यवसायाकडे अजिबात दुर्लक्ष होत नाही.
• उलट ज्ञानाचे 'AAA- Acquisition, Application & Assimilation' करणे या त्रिसूत्रीवर अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असल्याने अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्यांना जे ज्ञान प्राप्त होते ते उरलेल्या तीन आठवड्यात आपल्या व्यवसायात लागू करता येते. त्याचे बरे वाईट परिणाम लगेच दिसू लागतात, त्याबद्दल फॅकल्टीबरोबर चर्चा करून भविष्यकालीन कार्यप्रणालीत कोणते बदल करावेत ती सकारात्मक दिशा ठरवता येते.
• प्रत्येक सत्रामध्ये पालकांबरोबर संवादाचे आयोजन करण्यात येते.
• जागतिक व्यावसायिक दृष्टिकोन देण्यासाठी जपानमध्ये 'Global Outreach Program' चे आयोजन केले जाते.

कालावधी ११ महिन्यांची वर्गातील सत्रे. महिन्यातून सात दिवस लेक्चर्स, व्यवसायाच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी उरलेले तीन आठवडे. अखेरच्या शनिवारी चर्चेसाठी एका सत्राचे आयोजन. तज्ज्ञशिक्षक- प्रशिक्षक आणि सहा ध्यायी व्यावसायिकयांच्याशी होणाऱ्या चर्चेतून परिस्थितीवर मात करण्याचे एक नव्हे तर अनेक मार्ग दिसू लागतात ही या उपक्रमाची एक मोठी उपलब्धी आहे.

अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज उपलब्ध असण्याची अंतिम तारीख: ६ ऑक्टो २०१७

अधिक माहिती आणि अर्ज डाउनलोड करण्यासाठी: www.welingkar.org किंवा संपर्क साधा स्वनिल भोइटे, सेल: 9819776390,
ई-मेल: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division