सहकारी औद्योगिक वसाहती

सहकर औदयगक वसहतमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१६-१७ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...

मऔविम क्षेत्राव्यतिरिक्त सहकारी तत्त्वावर औद्योगिक वसाहती विकसित करण्याचा कार्यक्रम राज्याने हाती घेतला आहे. उद्योग स्थापित करण्यासाठी भाग भांडवलातील हिस्सा व सल्ला राज्य शासनाकडून देण्यात येतो. सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी राज्य शासनाकडून एकूण प्रकल्प खर्चाच्या २० टक्के भांडवल, बँक/ वित्तीय संस्थांकडून ६० टक्के कर्ज उभारणी आणि उर्वरित २० टक्के रक्कम उद्योग स्थापन करणार्या सभासदांचे भाग भांडवल असे आहे. सप्टेंबर २०१६ अखेर एकूण १४२ सहकारी औद्योगिक वसाहती नोंदणीकृत असून त्यापैकी १०७ वसाहती कार्यरत आहेत तर २९ वसाहती अद्याप कार्यान्वित होणे बाकी आहे आणि उर्वरित सहा अवसायनात गेल्या आहेत. एकूण १०७ सहकारी औद्योगिक वसाहतींमध्ये ८,०३७ घटक कार्यरत असून त्यामधील रोजगार सुमारे १.७९ लाख आहे. शासनाने ९३ सहकारी वसाहतींना अर्थसहाय्य पुरविले आहे. सहकारी औद्योगिक वसाहतींची स्थिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

sep 1

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division