सलील पारेख ‘इन्फोसिस’चे सीईओ

salil parekh‘इन्फोसिस’ने आज सलील पारेख यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.

जानेवारी २०१८ पासून सलील पारेख हे यूबी प्रवीण राव यांची जागा घेतील, असे ‘इन्फोसिस’ने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. पारेख हे सध्या कॅपजेमिनी या फ्रेंच कंपनीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. पारेख यांनी कॉर्नेल विद्यापीठातून संगणकशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉअलॉजी, मुंबई येथून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे.

पारेख हे पाच वर्षांसाठी ‘इन्फोसिस’चे सीईओ आणि एमडी असतील, असे कंपनीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.