जगातील सर्वांत मोठा स्मार्ट फोन प्रकल्प भारतात,
७० हजार लोकांना रोजगार

smart phoneपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाय-इन यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील ‘सॅमसंग’च्या विस्तारित मोबाइल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा जगातील सर्वाधिक मोबाइल हँडसेटचे उत्पादन करणारा प्रकल्प ठरणार आहे.दक्षिण कोरियाची महाकंपनी असलेल्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सकडून सध्या भारतात दरमहा ६७ लाख स्मार्ट फोन बनविले जातात. नव्या प्रकल्पामुळे आता कंपनी दरमहा १ कोटी २० लाख स्मार्ट फोनचे उत्पादन करेल.या प्रकल्पात ७० हजार लोकांना रोजगार मिळेल. सध्या असलेल्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी कंपनी ४,९१५ कोटी रुपये गुंतवत आहे.नोएडातील प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी सॅमसंगने4995कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. येथे उत्पादित होणाऱ्या फोनची युरोप, आशिया आणि आफ्रिकेत निर्यातही होणार आहे.भारत ही जगातील दुसºया क्रमांकाचा मोठा मोबाइल हँडसेटची बाजारपेठ आहे. जगात विकल्या जाणाºया एकूणस्मार्ट फोनपैकी10%स्मार्ट फोन भारतात विकले जातात. म्हणून भारत हा प्रकल्प सुरु करत आहे़.