आम्ही उद्योगिनी गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

aamhi udyoginiमहिला उद्योजकांना उद्योजकांसाठी परिवहन खात्याच्या विविध योजना जाहीर- दिवाकर रावते

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानमार्फत राजा शिवाजी विद्यालय दादर याठिकाणी दिवसभराची राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद आयोजित करण्यात आले होती. या परिषदेचे उद्घाटन विजया रहाटकर अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य महिला आयोग, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार अॅड. आशिष शेलार, उद्योजिका लीला बॉर्डिया, नीरजा कोरगावकर व साधू- एबीपी माझा या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी प्रास्ताविकात मीनल मोहाडीकर यांनी संस्थेची माहिती व ओळख करून दिली. आई.ई.एस मॅनेजमेंटचे डॉ. दिनेश हरसुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. 21 वर्षांपासून आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान ही संस्था विनामूल्य उद्योग मार्गदर्शन करत असते. राज्यातील उद्योजक महिलांना आम्ही उद्योगिनी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या संपूर्ण परिषदेत महिला उद्योजकांची वाटचाल, जडणघडण, शासकीय योजना यासंबंधी विविध सत्रात माहिती देण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातून या परिषदेला 900 हून अधिक महिला उद्योजिका उपस्थित होत्या. दिवसभर चाललेल्या या परिषदेमध्ये काही चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती.
यावर्षी आम्ही उद्योगिनी गौरव पुरस्कार दिपाली आठल्ये- मुंबई विभाग, मीना खांडेकर- पश्चिम महाराष्ट्र विभाग, मनीषा धात्रक- उत्तर महाराष्ट्र विभाग, वासंती देव- कोकण विभाग, रूचा देशपांडे- विदर्भ विभाग, विशेष पुरस्कार आदित्य बेहरे तर विशेष पत्रकारिता पुरस्कार विजया जोगळेकर धुमाळे व मुक्ता चैतन्य यांना देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन अनघा मोडक व दुहिता सोमण यांनी केले,

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division