सामुहिक प्रोस्ताहन योजना

technologyservicesमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१७-१८ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...

व्यावसायिक सुलभता
व्यावसायिक सुलभता म्हणजे उद्योगांसाठी सोपे, विनाविलंब आणि त्रासमुक्त नियम होय. व्यवसाय सुधारणा कृती योजना 2017 अंतर्गत 15 विभागांच्या कार्यकक्षेमधील 372 सुधारणा बाबींची यादी प्रकाशित करण्यात आली असून यामध्ये सहभागी असलेल्या राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी निर्धारित वेळेत या बाबींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी राज्याने 372 सुधारणा बाबींची अंमलबजावणी केली आहे व त्याबाबत पुरावे सादर केले असून त्यापैकी 348 सुधारणांना केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.

chart 8.3

महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सहाय्य केंद्र(मैत्री)

मैत्री, शासन ते उद्योग (G2B) पोर्टल, हे सध्या अस्तित्वात असलेले व संभाव्य गुंतवणूकदारांसाठी पूर्णपणे इंटरनेटला जोडलेले एक स्टॉप शॉप असून येथे गुंतवणूक प्रक्रियेबाबत एकत्रित माहिती मिळते. सध्या अस्तित्वात असलेले व संभाव्य गुंतवणूकदारांसाठी सर्व मंजुरी एकाच ठिकाणी मिळवून देण्याकरिता, अस्तित्वात असलेले व नवीन उपक्रमांना गुंतवणूक प्रक्रियेबाबत माहिती देण्याकरिता, ऑनलाईन व वेळेत परवानगी देण्याकरिता आणि उद्योगांच्या अडचणींचे निवारण करण्याकरिता राज्य शासनाने एक खिडकी कक्ष फेब्रुवारी, 2014 मध्ये सुरू केला आहे. मैत्री कक्षामार्फत उद्योजकांना उद्योगांच्या संबंधित 16 विभागांकडील एकूण 38 सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असून त्यापैकी 19 सेवा उपलब्ध झाल्या आहेत. मैत्री कक्षामार्फत नोव्हेंबर, 2017 पर्यंत एकूण 506 घटकांचे 980 प्रकरणे हाताळण्यात आली व त्यापैकी 901 प्रकरणी निकाली काढण्यात आली तर उर्वरित 79 प्रकरणांवरील प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

chart 8.4

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division