जपानची सॉफ्टबँक‘रिलायन्स जिओ’त 20 हजार कोटी गुंतविणार

jioदेशातील टेलिकॉम क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेली रिलायन्स जियोमध्ये लवकरच परदेशी कंपनी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळत आहे. आर्थिक परिस्थितीनुसार जगभरात 13 व्यास्थानावर असलेले मुकेश अंबानी यांच्या जियोमध्ये जपानच्या सॉफ्टबँकने गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. जपानची ही कंपनी 20 हजार कोटी जियोमध्ये गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं जात आहे.करोडपती मुकेश अंबानी यांनी जियोमधील काही हिस्सा विकण्यासाठी इच्छुक आहेत. आरआयएलने टेलिकॉम क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी रिलायन्स जियोलाकोट्यावधीरुपये दिले होते. आत्तापर्यंत तीन लाख कोटींचे कर्ज जियोच्या डोक्यावर असल्याने भार हलका करण्यासाठी मुकेश अंबानीकडूनजियोमधील काही शेअर्स विकण्याची तयारी दर्शवली आहे. जेपी मॉर्गन यांच्या माहितीनुसार, जपानमधील सॉफ्टबँक खूप दिवसांपासून जियोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक होती. मागील काही वर्षापासून अनेक गुंतवणुकदारांशी चर्चा सुरु होती. ज्यामध्ये सॉफ्टबॅँक या जपानमधील टेलिकॉम कंपनीने जियोमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचं दिसून आलं.रिलायन्स जियो गेल्या तीन वर्षापासून भारतात टेलिकॉम क्षेत्रात अग्रगण्य राहिली आहे. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणं भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र प्रत्यक्षात सॉफ्टबँक रिलायन्स जियोमध्ये कितपत पैसे गुंतवणूक करणार हे मात्र अजून नक्की झालेले नाही. कारण येणार्याप काळात रिलायन्स ई-कॉमर्स माध्यमातूनही व्यवसाय सुरु करणार असल्याचं बोललं जातंय. मात्र अजून नेमकी आकडेवारी कळलेली नाही.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division