सामुहिक प्रोस्ताहन योजना

technologyservicesमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१७-१८ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांनी उद्योग आधार ही नवीन प्रणाली सुरू केली आहे. यापूर्वी राबवण्यात येत असलेली नोंदणीची किचकट प्रक्रिया बंद करून एक पाणी नोंदणी प्रपत्र तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये नवीन व सध्या अस्तित्वात असलेले सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम यांच्या अस्तित्वाचे प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील, प्रवर्तक किंवा मालक यांचा आधार तपशील आणि इतर किमान मूळ माहिती स्वयं घोषणा स्वरूपात सादर होईल. या माहितीवर आधारित या सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी १२ अंकी एकमेव नोंदणी क्रमांक म्हणजे उद्योग आधार क्रमांक देण्यात येईल. सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम नोंदणीच्या पूर्वीच्या प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी व कागदपत्रे तपासण्यासाठी जी जो वेळ व श्रम खर्ची पडत होता, त्याच्या तुलनेत आता नोंदणी प्रक्रिया सुकर व जलद झाली आहे. या उपक्रमांची नोंदणी झाल्यावर उद्योजक शासनाचे सर्व लाभ योजना जसे कमी दर व्याज, सोपे कर्ज, हमी न देता कर्ज, अनुदाने इत्यादी. मिळण्यास पात्र राहतील. वर्ष २०१५ पासून डिसेंबर २०१७ पर्यंत, राज्यात एकूण ३.५९ लाख सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांनी उद्योग आधारासाठी नोंदणी केली आहे व त्यापैकी २.९५ लाख सूक्ष्म,०.६९ लाख लघु, व ०.०३ लाख मध्यम उपक्रम आहेत.

chart

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division