रेमंडचा रिंग गिअर्स प्रकल्प सिन्नरमध्ये

Remondरिंग प्लस अॅक्वा लि. (आरपीएएल) या रेमंड लिमिटेडच्या उपकंपनीने व ऑटोमोटिव्ह कम्पोनंटच्या उत्पादनातील प्रवर्तकाने सिन्नर येथे शुक्रवारी तिसऱ्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन झाले. बीएमडब्लू, फोर्ड, मारुती-सुझुकी, ह्युंदाई, होंडा, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, कमिन्स, व्हीईसीव्ही, कॅटरपिलर, फियॅट अशा ओईएमचा आरपीएएल हा प्रमुख पुरवठादार आहे.
सिन्नर तालुका को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीअल इस्टेट (एसटीआयसीई) येथे वसलेला हा प्रकल्प एसटीआयसीई येथे सध्या सुरू असणाऱ्या व स्टार्टर रिंग गिअर्स, ट्रान्समिशन फ्लेक्स-प्लेट व इंटिग्रल शाफ्ट वॉटर पंप बेअरिंग यांची निर्मिती करणाऱ्या दोन प्रकल्पांबरोबरच स्टार्टर रिंग गिअर्सची निर्मिती करणार आहे. बीएमडब्लू, फोर्ड, मारुती-सुझुकी, ह्युंदाई, होंडा, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, कमिन्स, व्हीईसीव्ही, कॅटरपिलर, फियॅट अशा ओईएमचा आरपीएएल हा प्रमुख पुरवठादार आहे.

नव्या प्रकल्पाची वार्षिक दोन दशलक्ष रिंग गिअर्स निर्मितीची क्षमता असेल. लीन मॅन्युफॅक्चरिंग व सिंगल पिस फ्लो प्रॉडक्ट-लाइन या प्रभावी संकल्पना वापरून, आरपीएएल उत्पादनक्षमता वार्षिक ८.२ दशलक्ष रिंग गिअर्सपर्यंत वाढवणार आहे. जागतिक ऑटोमोटिव्ह व औद्योगिक बाजारांना सेवा देणार आहे. सध्या, कंपनीने सिन्नरमधील तसेच परिसरातील ११०० स्थानिक लोकांना रोजगार दिला आहे. तसेच नव्या प्रकल्पामुळे २०० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. यामुळे आरपीएएल ही या प्रदेशातील सर्वात मोठी एम्प्लॉयर ठरणार आहे.

परिवर्तनाच्या वाटचालीत आम्ही नफात्मक वाढ साधणाऱ्या आमच्या नॉन-कोअर व्यवसायावर भर दिला आहे. रिंग गिअरचे उत्पादन करण्याबाबत विस्तार योजनेअंतर्गत, ४५ कोटी रुपये गुंतवणूक असणारा हा नवा प्रकल्प सध्याच्या उत्पादनाची क्षमता आणखी वाढवणार आहे. या प्रकल्पामुळे कंपनीला आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत स्तरावर नव्या ग्राहकांचा शोध घेण्यासाठी जागतिक विस्तार करण्यासाठी मदत होणार आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division