महाराष्ट्र सरकारतर्फे स्टार्टअप्ससाठी इनोव्हेशन हब

maharashtraमहाराष्ट्रातील स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांत भर म्हणून महाराष्ट्रात इनोव्हेशन हब तयार करणे महत्वाचे असेल. स्टार्टअप्सच्या उपक्रमशीलतेला चालना देणाऱ्या टी-हब संस्थेच्या इनोव्हेशन हब या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेबाबत राजभवन येथे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत मार्गदर्शन करताना राज्यपाल विद्यासागर राव बोलत होते.
राज्यातील नवउद्यमींच्या विकासासाठी देश आणि विदेशातील उद्यमशील उपक्रमांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.यात इनोव्हेशन हब उपयुक्त ठरेलत्यासाठी टी-हब आणि नॅसकॉम या संस्थांच्या समन्वयातून एका अभ्यास गटाच्या माध्यमातून अशा विविध संधी, पर्यायांचा पडताळा घेण्यात यावा. या संकल्पनेचा परिपूर्ण अभ्यास करून, त्याबाबतचा अहवाल तयार करण्याची सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division