RBI ची रेपो दरात ०.२५% ची कपात

Rbiभारतीय रिझर्व बँकेने पत धोरण आढावा जाहीर केला असून, त्या नुसार रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्जे स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नव्या दरानुसार रेपो दर ६.०० टक्क्यांहून ५. ७५ टक्क्यांवर आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तथापि, समितीने रिझर्व्ह रेपो दरात कोणतीही कपात केलेली नाही.
भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पत धोरण आढावा जाहीर केला असून, त्या नुसार रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्जे स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नव्या दरानुसार रेपो दर ६.०० टक्क्यांहून ५. ७५ टक्क्यांवर आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तथापि, समितीने रिझर्व्ह रेपो दरात कोणतीही कपात केलेली नाही.

रेपो दरावर आधारित रिझर्व्ह बँक बँकांना फंड वितरीत करत असते. रेपो दरात कपात झाल्याने बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात निधी उपलब्ध होऊ शकतो. या मुळे बँका गृहकर्जे, कार लोनसह इतर कर्जे कमी व्याजदरात देऊ शकणार आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे नवे कर्ज स्वस्त होणार आहे, तर कर्जे घेतलेल्या लोकांच्या हफ्त्याच्या रकमेत कपात किंवा रिपिटेड कालावधीत कपातीचा फायदा होऊ शकतो.
तथापि, पतधोरण समितीने आपल्या धोरणाचा रोख तटस्थतेवरून तो लवचिक पातळीवर आणला आहे. महागाई दरात घट झाल्याने पतधोरण समिती पतधोरणाच्या स्थितीबाबत आपला 'तटस्थ' दृष्टीकोन बदलू शकते, असे तज्ज्ञांनी आपले मत मांडताना म्हटले होते.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division