'स्टार्टअप इंडिया' आता महिलांनाही लाभणार

start upनवोद्योजकांनी स्टार्टअप इंडिया योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याचवेळी या लाभार्थी नवोद्योजकांमध्ये एक तृतीयांश नवोद्योजक महिला असतील, हे जाणीवपूर्वक पाहिले जाणार असल्याचे उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव रमेश अभिषेक यांनी सांगितले.

महिलांनी मोठ्या प्रमाणावर स्वतः उद्योग सुरू करावेत यासाठी विभाग प्रोत्साहन देणार आहे. त्याअंतर्गत बँका व व्हेन्चर कॅपिटल फंड यांच्याबरोबर उद्योग सुरू करण्यास उत्सुक असलेल्या नवोद्योजक महिलांची थेट चर्चा घडवून आणण्यातही उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग पुढाकार घेणार आहे. यातून स्टार्टअप इंडियाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये एक तृतीयांश प्रमाण महिलांचे असेल, यावर भर दिला जाईल. अशाच प्रकारे अन्य विभाग व राज्ये यांनाही लाभार्थींमध्ये महिलांचे प्रमाण एकूण लाभार्थींच्या एक तृतीयांश राहील,
नव्याने उद्योग स्थापन करू इच्छिणाऱ्या महिलांना त्यांनी निवडलेल्या उद्योगक्षेत्रातील आव्हानांचा परिचय करून दिला जाणार आहे. महिलांची उद्योजकता वाढवण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.

स्टार्टअप इंडिया हा केंद्र सरकारने जानेवारी २०१६मध्ये घोषित केलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत नवोद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार केले जाते. नवोद्योग स्थापन होणे, सध्याचे नवोद्योग भरभराटीस येणे त्याचप्रमाणे नवोद्योगांच्या विस्तारासाठी प्रोत्साहन दिले जाणे अशा विविध उद्देशांसाठी हा उपक्रम सरकारने सुरू केला आहे. आतापर्यंत विभागाने १८ हजार ८१३ स्टार्टअपची नोंदणी केली आहे. या सर्व नवोद्योगांना विविध सवलतींसाठी अर्ज करता येतील, असे या विभागाने सांगितले आहे.

उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे निर्णय :

- महिलाकेंद्री किंवा महिलाप्रधान स्टार्टअपना एकूण एक हजार कोटी रुपे अर्थसाहाय्य देणे.

- महिला उद्योजकांची क्षमता वाढवण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यासक्रम चालवणे

- महिला नवोद्योजकांना कायदेविषयक, करविषयक तसेच आर्थिक सल्ले देणारी यंत्रणा निर्माण करणे

- बँका व निधी संस्थांबरोबर थेट चर्चा घडवणार

- महिलांना प्राधान्य देण्याबाबत अन्य राज्यांनाही सूचना

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division