सामुहिक प्रोस्ताहन योजना

technologyservicesमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१७-१८ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...

विशेष आर्थिक क्षेत्रे
8.8 राज्याने फेब्रुवारी 2006 पासून विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ)धोरण स्वीकारले असून ऑक्टोबर, 2017 पर्यंत राज्यात 246 विशेष आर्थिक क्षेत्रांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. राज्यामध्ये 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत 4,087 हेक्टर क्षेत्रावर 35,024 कोटी गुंतवणुकीची 28 विशेष आर्थिक क्षेत्रे कार्यान्वित झाली व त्यामधून सुमारे 5.25 लाख रोजगार निर्माण झाला.

माहिती तंत्रज्ञान संकुले
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सिडको व सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया यांनी 37 सार्वजनिक माहिती तंत्रज्ञान संकुले विकसित केली. त्यामध्ये सुमारे 18000 कोटी गुंतवणूक असून सुमारे 2.5 लाख रोजगार निर्माण झाला.
8.9.1 खाजगी क्षेत्राला सहभागी करून माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता 506 खाजगी माहिती तंत्रज्ञान संकुले मंजूर करण्यात आली. त्यापैकी 185 माहिती तंत्रज्ञान संकुले कार्यरत असून त्यामधील गुंतवणूक रुपये 4738 कोटी असून त्यामधून 6.32 लाख रोजगार निर्माण झाला. उर्वरित 321 माहिती तंत्रज्ञान संकुलांमधून रुपये 12828 कोटी गुंतवणूक प्रस्तावित असून सुमारे 17.10 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. खाजगी माहिती तंत्रज्ञान संकुले पुणे (177) मुंबई शहर व मुंबई उपनगर (165) ठाणे (150) नागपूर (5) नाशिक (5) औरंगाबाद (3) आणि वर्धा (1) या जिल्ह्यांमध्ये आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division