अल्पबचत योजनापूर्तीनंतरही मिळणार एजंटचे साह्य

agentjpgअल्पबचत योजनांची मुदतपूर्ती झाल्यानंतर व्याजासह मिळणारी रक्कम घेण्यासाठी टपाल (पोस्ट) शाखेत जाण्याचे गुंतवणूकदारांचे कष्ट वाचणार आहेत. गुंतवणूकदाराने एजंटला मुखत्यार (मेसेंजर) नेमले असताना योजनेच्या मुदतपूर्तीनंतरची रक्कम गुंतवणूकदाराला धनादेशानेच देण्याची (मेसेंजर पेमेंट) एजंटला अनुमती असावी, अशी मागणी अखिल भारतीय महिला प्रधान व अल्पबचत एजंट महासंघाने टपाल विभागाकडे केली आहे.

अल्पबचत योजनांची मुदतपूर्ती झाल्यानंतर व्याजासह मिळणारी रक्कम घेण्यासाठी टपाल (पोस्ट) शाखेत जाण्याचे गुंतवणूकदारांचे कष्ट वाचणार आहेत. गुंतवणूकदाराने एजंटला मुखत्यार (मेसेंजर) नेमले असताना योजनेच्या मुदतपूर्तीनंतरची रक्कम गुंतवणूकदाराला धनादेशानेच देण्याची (मेसेंजर पेमेंट) एजंटला अनुमती असावी, अशी मागणी अखिल भारतीय महिला प्रधान व अल्पबचत एजंट महासंअल्पबचत योजनापूर्तीनंतरही मिळणार एजंटचे साह्य

अल्पबचत योजनांची मुदतपूर्ती झाल्यानंतर व्याजासह मिळणारी रक्कम घेण्यासाठी टपाल (पोस्ट) शाखेत जाण्याचे गुंतवणूकदारांचे कष्ट वाचणार आहेत. गुंतवणूकदाराने एजंटला मुखत्यार (मेसेंजर) नेमले असताना योजनेच्या मुदतपूर्तीनंतरची रक्कम गुंतवणूकदाराला धनादेशानेच देण्याची (मेसेंजर पेमेंट) एजंटला अनुमती असावी, अशी मागणी अखिल भारतीय महिला प्रधान व अल्पबचत एजंट महासंघाने टपाल विभागाकडे केली आहे. ही मागणी मंजूर झाली असून लवकरच या संदर्भात शासननिर्णय जारी केला जाईल, असे आश्वासन मिळाल्याचे महासंघाच्या अध्यक्ष राजश्री भगत यांनी महाराष्ट्र टाइम्सला सांगितले.

टपाल एजंटांच्या विविध मागण्या टपाल अधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर नवी दिल्लीमध्ये महासंघाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीला टपाल विभागातर्फए कोअर बँकिंग सोल्युशन्सचे अखिल भारतीय संचालक सचिन किशोर व अखिल भारतीय राष्ट्रीय बचत विभागाचे संचालक ए. के. चौहान उपस्थित होते. बैठकीला देशभरातून मोठ्या प्रमाणावर एजंट उपस्थित होते. या संदर्भात भगत म्हणाल्या, 'अल्पबचतीच्या योजनांची मुदतपूर्ती झाल्यावर एजंटकडून या रकमा स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे, रक्कम तात्काळ गुंतवणूकदाराला न देणे यांसारखे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदतपूर्तीनंतर पैसे घेण्यास गुंतवणूकदाराने स्वतः येणे टपाल विभागाने बंधनकारक केले. परंतु अल्पबचत करणाऱ्यांमध्ये अनेक गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक असतात, अशिक्षित असतात तसेच, नोकरदारांना कामाच्या वेळेत पोस्टाच्या शाखेत जाणे जमत नाही. यावर उपाय म्हणून एजंटने पोस्टाकडून रक्कम धनादेश स्वरूपातच घेऊन गुंतवणूकदाराला द्यावी, अशी रचना करण्याची विनंती महासंघाने टपाल विभागाला केली.' महासंघाची ही विनंती मंजूर करत शासननिर्णय जारी करण्याचे आश्वासन सचिन किशोर यांनी दिले.

नव्या एजन्सी द्याव्यात 
गेल्या १०-१२ वर्षांपासून देशात पोस्टाची नवी एजन्सी देणे सरकारने थांबवले आहे. महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू या राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. नव्या एजन्सी दिल्यास पोस्टाचे जाळे आणखी विस्तारेल व हजारो लोकांना रोजगार मिळेल, असा दावाही महासंघाने केला. 

अॅसलास-५ कार्डाचा पुरवठा करावा 
अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर पोस्टाचा एजंट गुंतवणूकदाराला अॅसलास-५ हे कार्ड भरून देतो. या कार्डांचा तुटवडा अनेक पोस्ट शाखांतून आहे. या कार्डावर एजंटचे नाव, संपर्क क्रमांक, एजन्सी क्रमांक अशी माहिती असल्याने गुंतवणूकदाराला एजंटचा माग काढणे सहज शक्य होते. म्हणून अॅसलास-५ कार्डांचा पुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणीही महासंघाने केली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division