धनगर समाजासाठी हजार कोटींची तरतूद

dhangar samajधनगर समाजाचा आर्थिक, शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले. एडगाव-वायबोंशी येथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. जानकर म्हणाले, ""धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सरकार देखील त्यासाठी सकारात्मक पावले उचलित आहे; मात्र आरक्षणामुळे समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक विकासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून सरकारने विशेष निधीची तरतूद केली आहे. पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून धनगर समाजातील लोकांना दहा लाख घरकुल देण्यात येणार आहे. आपले सरकार कुठल्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही. या भागाचा विकास व्हावा, अशी आपली प्रबळ इच्छा आहे. काजू प्रकल्पासाठी 100 कोटी मंजूर आहेत. येथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर टुरिझम सुरू करण्यात येणार आहे.''
एडगाव-वायबोंशी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साडेतीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहितीही या प्रसंगी जानकर यांनी दिली.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division