पुरणपोळी आईस्क्रीम आणि बरंच काही...

20141118 fb profileपुरणपोळी, बुंदीचे लाडू अशी अस्स्ल महाराष्ट्रीय पक्वान्नं जर थंडगार आईस्क्रीमच्या रुपात समोर आली तर कशी लागतील, या कल्पनेतून एक तरुण वेगवेगळे प्रयोग करत राहतो. एक दोन िदवस नाही तर तब्बल तीन चार महिने निरिनराळ्या फ्लेवर्सवर त्याचे वििवध प्रयोग चालू राहतात. नवनवीन चवींच्या शोधात असणाऱ्या खवय्यांची पसंती नक्की मिळणार हा िवश्वास मनाशी बाळगून तो रेस्टॉरंट्स, आईस्क्रीम पार्लर्स गाठतो. आज दहापैकी नऊ जणांकडून ऑर्डर्स घेत व्यवसायाची घोडदौड सुरू ठेवणाऱ्या "आईस्टसी' या त्याच्या ब्रॅंडने अल्पावधीत जे यश आणि नाव कमावलं आहे ते िन:संशय कौतुकास्पद आहे.
हे "स्टार्ट अप' सुरू केले आहे पराग चाफेकर याने. मार्केटिंगमध्ये एम.बीए. केलेल्या या तरुणाने काही वर्षं त्याच क्षेत्रात नोकरी केली. काही काळ कन्सल्िटंगमध्येही काढला. पण खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात स्वत:चं कािहतरी करावं ही इच्छा मात्र स्वस्थ बसून देईना. पाल्र्यातील एक आईस्क्रीम पार्लर चालवणाऱ्या सन्िमष मराठेशी त्याचा परिचय झाला. पाल्र्यात या व्यवसायात असलेली तीव्र स्पर्धा, जागेचे भाडे, कामगारांचे प्रश्न अशा अनेक कारणांनी तो धंदा फारसा चालत नव्हता. हाच व्यवसाय वेगळ्या पद्धतीने चालवण्याची ऑफर परागने या नव्या िमत्राला िदली. सन्िमषने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. दोघांची मतं, तत्वं जुळली आिण पुढे एकत्र येऊन आईस्क्रीमचाच व्यवसाय करायचा हे पक्कं झालं.
"आईस्टसी प्रोजेक्ट्स प्रा.िल.' हे हटके नाव धारण करून या दोघांनी नव्या जोमाने सुरुवात केली. यािवषयी पराग म्हणतो,"जोगेश्वरीला असलेलं प्रशस्त उत्पादन केंद्र आम्ही पाल्र्याच्या या लहान गाळ्यात हलवलं. पार्लरद्वारे होणारी किरकोळ िवक्री बंद करून बी टू बी, म्हणजे थेट िवक्रेत्यांना माल िवकायचा हे ठरवलं. सहजतेने उपलब्ध असलेले फ्लेवर्स आम्ही टाळले. जे सहसा िमळत नाही ते करायला सुरुवात केली. रेस्टाॅरंट्स, क्लब अशा िठकाणी पसंत पडतील अशी चिवष्ट आईस्क्रीम्स पुरवताना आपल्या मालाला आपलंच नाव लागलं पािहजे हा इगो थोडा बाजुला ठेवला. जगभरात असं िदसतं की त्या त्या खाद्यसंस्कृतीमधील खास चवी डेझर्टच्या रुपाने पेश केल्या जातात. आम्ही आपली पक्वान्ने आईस्क्रीमच्या रुपात आणण्याचा प्रयत्न केला. हा पिहला प्रयोग पुरणपोळीवर केला. ही कल्पना आमचीच आिण नवल म्हणजे दुसऱ्या ितसऱ्या प्रयत्नातच पुरणपोळी आईस्क्रीम बनवण्यात आम्हाला यश आलं.
िमलिंद साळवी हे फूड टेक्नॉलॉिजस्ट आहेत. त्यांच्या सल्ल्याने "आईस्टसी'मध्ये नवनवीन प्रयोग होत असतात. काही प्रयोग यशस्वी व्हायला पाच सहा मिहनेदेखील झटावे लागले. गुणवत्त्ाा हा प्रमुख िनकष समोर ठेवून उत्पादनांमध्ये भरपूर वैिवध्य आणण्यात आलं. नारळीभात, बुंदीचे लाडू, आलं, पॉपकॉर्न अशा हटके फ्लेवर्सचं बाजारात उत्त्ाम स्वागत झालं. इथल्या आईस्क्रीममध्ये सीताफळ, पेरू, अंजीर तर वापरले जातातच पण रामफळाचंही आईस्क्रीम बनतं. चायनीज किंवा साउथ इस्ट एिशयन रेस्टॉरंट्समध्ये काळे तीळ वापरले जातात. म्हणून त्यांच्यासाठी खास काळे तीळ घालून बनवलेलं आईस्क्रीमदेखील ग्राहकांच्या पसंतीला उतरलं. प्रॉडक्ट रेंजमध्ये भर घालणं अजूनही चालू आहेच.
नवीन व्यवसाय म्हटला की कॅश फ्लो, नफा-तोट्याचं गिणत जमवणं हे आलंच. याविषयी िवचारले असता पराग म्हणतो, "आईस्क्रीम बनवण्याची मिशन्स आमच्याकडे होतीच. इतर आवश्यक बाबींसाठी आम्ही स्वत:च भांडवल उभारणी केली. त्या काळात अनावश्यक खर्चावर काटेकोरपणे िनर्बंध घातले. ऑफिसमध्ये ए.सी.देखील लावला नाही. स्वच्छतेच्या दृष्टीने जे आवश्यक होते ितथेच खर्च केला. उधारीवर पूर्ण िनयंत्रण आणलं. कामगारांच्या अनुपस्िथतीत स्वत: साफसफाईपासून प्रत्यक्ष आईस्क्रीम बनवण्यापर्यंत सगळी कामं केली. आज या व्यवसायाला दीड वर्षं झालं पण दुसऱ्या ितसऱ्या मिहन्यापासूनच धंद्यात फायदा िमळायला लागला. जाणीवपूर्वक वेगळं काम करण्याचा आमचा िनर्णय बरोबर ठरल्याचं आज समाधान वाटतंय! भिवष्यात आपल्या खास चवी घेऊन जागतिक बाजारपेठेत उतरायचाही आमचा विचार आहे.'

- िचत्रा वाघ
9821116936

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division