ध्येय निवडा,योजना आखा,आणि स्वप्नांचा पाठलाग करा.....

LAKSHAVEDHIमेकॅनिकल इंजिनियरिंगच्या पदवी नंतर एम. बी. ए. केल्यावर हळूहळू पण सुनिश्चित आपल्या ध्येयाच्या दिशेने पावलं टाकणारे ,वेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अरुण करंबेळकरांचा परिचय आपण यावेळी करुन घेणार आहोत.

अरुणजी हिंदुस्थान कंन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजेच HCC चे माजी अध्यक्ष व CEO. कंपनीचा जवळजवळ १०० वर्षाचा अभियांत्रिकी वारसा असल्यामुळे भारतातील २५% हायड्रोपॉवरचे आणि भारताच्या परमाणु ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या ६५% पेक्षा जास्त तसेच ३८०० लेनकि.मी.एक्सप्रेस वे आणि महामार्ग तसेच ३३५ कि,मी.पेक्षा अधिक जटिल टनेलिंग आणि ३६५पेक्षा जास्त ब्रीज ज्यात सी लिंक सारख्या देशाच्या आभिमानाचे प्रतिक असलेला मुंबईला समुद्रावर बांधलेला उत्कृष्ट स्थापत्यशास्राचं उदाहरण असलेल्या पुलाचा समवेश आहे. अश्या ह्या HCC कंपनीत जी भूमिगत तसेच एलिव्हेटेड मेट्रो बांधकामात अग्रणी कंपनी आहे, अश्या कंपनीच्या उच्च पदावर काम करतांना अरुणजी म्हणतात की आव्हानात्मक गोष्टीतील सर्व आव्हाने पेलत यशस्वी होण्याचा प्रयत्न केला की सर्व साध्य होतं, मिळत जातं. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, कलकत्ता मेट्रो,दिल्ली मेट्रो आता मुंबईतल्या मेट्रोची कामं. भारतातली३५% धरणं,धृव सारखं न्युक्लीअर पॉवर स्टेशन,रेल्वेसाठी कित्येक पूल, बोगदे, नेव्हीसाठी डॉक बांधून देणे, अगदी अलिकडे आपण रशियाकडून घेतलेल्या पाणबुडीसाठी समुद्रात ३/४ मजले खोल ड्रायडॉक बांधणे अशी अनेक काम HCC कंपनी करत असतांना ह्या सगळ्या आगळ्यावेगळ्या, प्रतिष्ठेच्या, देशासाठी गौरवशाली असणाऱ्या कामांमध्ये अरुणजींच फार मोलाचं योगदान आहे. बरीचशी कामं अरुणजींच्या देखरेखीखाली झाली आहेत. त्यावरुन त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो. राष्ट्रासाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पासाठी काम करतांना विशेष आनंद झाला असं अरुणजी नमूद करतात. विचार, जबाबदारी आणि जाणिवा यांचा समतोल सांभाळणं खरंतर कठीण, तरी पण कंपनीत उच्चपदावर असल्याने ते पेलत, सुवर्णमध्य साधत, एकत्रीतपणे, हाताखालच्या माणसांच्या सहसोबतीने,त्यांना सांभाळून घेत,प्रेरणा देत,त्यांच्याकडून काम करुन घेण्याचं आगळं कसब त्यांच्यात होत. बिहार,असाम सारख्या संवेदनशील भागात काम करतांना भूकंप, हवामानातील अचानक बदल अश्या नैसर्गिक तर कामावरच्या माणसांना त्रास देणे,त्यांना पळवून नेणे अशा मानवीय अडचणी उभ्या ठाकायच्या. अशा वेळी प्रत्यक्ष नाही पण तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन,जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर, विरुद्ध बाजूच्या लोकांशी संपर्क करुन, वाटाघाटी करुन आपल्या माणसांना सुखरुप परत आणणे,तिथल्या कामगार वर्गाला आश्वस्त करुन पुन्हा काम करण्यासाठी तयार करणे ही अतिशय संवेदनशील कामं त्यांनी यशस्वीरीत्या हाताळली. शांतता, सद्-भावना व सद्-विचारांची कास धरुन प्रयत्न केला आणि बरोबरच्या लोकांवरा विश्वास ठेवला की येणारे अडथळे नक्कीच दूर होतात. किमान पक्षी आपल्याला मार्ग तरी सापडतोच ह्यावर अरुणजींचा ठाम विश्वास. कंपनीतर्फे उत्तराखंड मधील गदर, तसेच लेह इथे ढगफुटी झाल्यानंतर तिथे पुनर्वसनासाठी मदत करणे, २६ जूलैच्या प्रलयकारी पावसानंतर मुंबईत, तसेच गुजरातमध्ये भूज मधील भूकंपानंतर तिथे आपत्ती व्यवस्थापनचं प्रशिक्षण घेतलेल्या माणसांना मदतीला पाठवणे. लेह-लडाख मध्ये १०००० फुटांवर काम करतांना, तसेच कारगील युद्धानंतर तिथे बांधकाम करण्यासाठी कामगारांना मानसिक आधार देणे, कामासाठी उद्युक्त करणे,त्यांना भरवसा देणे, प्रेरणा देणे ह्या अतिशय महत्वाच्या कामामध्ये त्यांच खूप मोलाच योगदान आहे.

त्यांच्या आधिकारात कुडन कुलम हे कन्याकुमारी, तामिळनाडूतील भारतातील एकमात्र सर्वात मोठ परमाणु ऊर्जा केंद्र आणि किशनगंगा सारखं अतिविशेष महत्वाचं पाकिस्तानच्या सीमेजवळ झेलम नदीवर बांधलेलं जलविद्युत सयंत्र, ह्या भारतासाठीच्या अतिप्रतिष्ठेच्या प्रकल्पाच्या वेळी त्या कामात आपण कंपनीच्या अर्थातच देशाच्या उपयोगी पडलो याचं अतिव समाधान आणि अत्युच्च आनंद आपल्याला मिळाला .नुसती बिल्डिंग उभी करणं वेगळं आणि देशासाठी अभिमानास्पद असलेले प्रकल्प उभ करणं, त्यासाठी आपला हातभार लागणं यासारखी आनंदाची गोष्ट नाही. किशनगंगा प्रकल्पाच्या वेळेचे अनुभव तरा कधीच न विसरता येणारे,धरणाचं काम चालू असतांना समोर पाकिस्तानची सीमा. त्यांनी बऱ्याच अडचणी निर्माण करायला सुरुवात केली, समोर डोंगरावरुन बरयाचवेळा गोळीबार झाला. बॉम्बशेल टाकले.३/४ दिवस काम बंद. मिल्ट्रीचा पाठिंबा व मदत असल्याने त्यांनी तत्परतेने प्रतिउत्तर देऊन, न फुटलेले बॉम्ब डिफ्युज करुन सर्वतोपरी सहाय्य केलेलं. पाकिस्ताननेपण निलम-झेलम ह्या जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू केलेलं, दोघांपैकी कोणाच्या धरणात आधी पाणी भरणार यांत चढाओढ. तिकडून कायम कुरघोड्या अशा वेळी धरणावरच्या कामगारांना वेळोवेळी प्रेरणा देणे,परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करुया असे अनेक उत्साहवर्धक वक्तव्य आणि अडथळा दूर करण्याचे कसब कामगारांमध्ये पेरण्याची खूप महत्वाची जबाबदारी आपण उच्चपदस्थ असल्याने करता आली आणि ती चांगल्या रितीने पार पाडली. भारताने हा प्रकल्प सर्वात आधी पूर्ण केला याचं समाधान अरुणजींना आनंद देऊन जातो. भूतानमधले ७५% ब्रीजेस्,जलविद्युत प्रकल्प तसेच नॉर्वेतले काही प्रकल्प भारताने पूर्ण केले आहेत. त्यासाठीचं बरंच मोठ योगदान अरुणजींचं आहे. भूतान/नॉर्वे चे पंतप्रधान, भारताचे अनेक मंत्री, उच्चपदस्थ व्यक्ती यांच्या भेटी,त्यांच्याबरोबर संवाद साधणं हा आपल्या जीवनातील सोनेरी काळ इति अरुणजी. मुंबईतील पाईपलाईन १०० वर्ष जुन्या,त्यात नवीन पाईपलाईन पृष्ठभागावरुन नेण अशक्य, अशावेळी तुलसी,विहार,पवई लेक मधून मीठी नदीच्या पण खूप खालून नवीन पाईपलाईन बसवण्याचं मुंबई महानगरपालिकेने दिलेलं काम आपल्या मार्गदर्शनाखाली झाल्याचा अभिमान अरुणजींना वाटतो.

HCC च्या मार्केट सेगमेंटमध्ये धोरणात्मक उपक्रमांव्दारे व्यवसाय वाढीसाठी अरुणजींनी अतिशय मोलाचं योगदान दिलं. ती जबाबदारी यशस्वीपणे पेलली. अश्या ह्या समृद्ध अनुभवांमध्ये हायड्रोपॉवर,परमाणु ऊर्जा, थर्मलपॉवर,वाहतूक/जल सोल्यूशन, पोर्टर्स आणि मरीन वर्क्स इंडस्ट्रीअल कन्स्ट्रक्शन यांचा समावेश आहे.ECP क्षेत्रातील SAP अंमलबजावणीमध्ये सामील असलेल्या समूह कंपनी HighbarTechlogiesला सल्लागार म्हणून काम केले. त्यांनी नाशिक जवळ २१२ एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे वाईनयार्ड आणि वायनरी पूर्णपणे स्थापित करुनदिले. त्याला बरीच international awards मिळाली आहेत. इतकचं नाहीतर विमानचालक विभागात हॉकर २००,जेटहॉकर ४००० आणि दोन हेलिकॉप्टरबेल्स ४०७ व४२७ यांचा समावेश असलेल्या विमानासंदर्भातील प्रवासी व अॉपरेटिंग प्रणालीचे निरिक्षण अरुणजींच्या देखरेखीखाली झाले आहे.HCC येथे २७ वर्षापेक्षा जास्त करियरच्या काळात पूर्वीच्या भूमिकेत संपूर्ण पुरवठा साखळी आणि वीजबंदीसह खरेदी व sub contracting च्या रणनितिक कार्यात गुंतलेले देशभरात १५००० कोटी रुपये किंमतीचे HCC च्या बांधकाम उपकरणाचे सहकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत. मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये बेंचमार्क ERP पद्धतींचा वापर करण्यामध्ये चालकशक्ती तसेच HCC येथे ई-प्रोक्योरमेंट सुरु करण्यासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली HCCला त्यांच्या मटेरियल्स मॅनेजमेंट मॉड्यूलच्या सर्जनशील वापरासाठीSAP चा 'बेस्ट इनोव्हेशन'चा पुरस्कार देण्यात आला. एच.सी.सी. कसेशन्स लिमिटेड, एच.सी.सी.एव्हिएशन लिमिटेड, एच.सी.सी.रियल्टी लिमिटेड, स्टेनर इंडिया लिमिटेड.,एकोमोटेल हॉटेल लिमिटेड,लेकव्ह्यू क्लब लिमिटेड, दासवे हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट लिमिटेड, दासवे रिटेल लिमिटेड आणि चरोसा वाईनरी इत्यादी समवेत असंख्य HCC गृप कंपन्यांच्या मंडळावर संचालक म्हणून काम केले. जुन्यापासून बोध आणि नव्याचा शोध घेणाऱ्या अरुणजींनी निवृत्ती नंतर स्वतः साठी व कुटुंबासाठी वेळ देण्याचं ठरवलं आहे. जोपर्यंत मनात आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे. Life is beautiful असे मानणाऱ्या अरुणजींनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा लोकांना मिळावा म्हणून ते काही कंपन्यांचे स्वतंत्र संचालक म्हणून काम बघतात. आणि अतिशय नम्रपणे अरुणजी म्हणतात की, यशाची शिखरं चढतांना अनेकजण शिड्या होऊन, कधी मदतनीस होऊन, कधी कर्तव्य, कधी सेवा देऊन हातभार लावत असतात. ह्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तरच यश हे खरं यश असतं.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division