करविषयक तरतुदी नि:संदिग्धच असाव्यात

                                                       – संतोष मंडलेचा, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

1केवळ व्यापारी उद्योजकाच नव्हे तर सर्वसामान्य करदात्यांच्या दृष्टीने विविध प्रकारचे कर महत्वपूर्ण असतात. कराबाबत एक म्हण प्रचलित आहे ती अशी की, "मरण आणि कर कधीच चुकत नाही." यावरून करांचे महत्त्व लक्षात येते.
संदिग्ध तरतुदी – कोणत्याही कर कायद्यांमध्ये करांचे दर आणि त्या संदर्भात दिलेल्या सवलती, वजावटी किंवा सूट हे महत्वाचे असते. अनेक वेळा या करविषयक कायद्यामधून असणाऱ्या तरतुदी या संदिग्ध असतात. त्यामुळे करदात्याला निष्कारण कोर्टबाजी करावी लागते व मनस्तापही सहन करावा लागतो. अशा संदिग्ध तरतुदी केल्याबद्दल कोणत्याही तर्काने कर्मचार्याअला कसलाही त्रास होत नाही किंवा शिक्षाही केली जात नाही. वेळोवेळी अशी प्रकरणे न्यायालयात निर्णयासाठी जात होती आणि पुढेही जात राहतील. अशावेळी करदात्यांच्या बाजूने एक अत्यंत महत्वाचा असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता. त्यानुसार कर सवलतीच्या अथवा सुटीच्या संदर्भातील अधिसूचना व तरतुदी संदिग्ध असतील तर त्याचा लाभ करदात्यांना दिला जावा असा हा निर्णय होता. त्यामुळे काहीअंशी तरी सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी निर्णयापासून करदात्यांस संरक्षण व दिलासा मिळे. गेली साडेचार दशके ह्या कायद्याचा (सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायदा समजला जातो) लाभ सर्वांना मिळत होता.
नवा निर्णय – काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, जर करविषयक सवलती अथवा सुत यामध्ये संदिग्धता असेल तर त्याचा निर्णय सरकार पक्षात केला जावा. या निर्णयामुळे सर्वसामान्य करदात्यांना करविषयक अंमलबजावणी करणाऱ्या अधिकार्यांच्या मनमानीला तोंड देणे अधिक अवघड होणार आहे. मुळातच करदात्यांना कधीही विश्वासात घेऊन कायदे केले जात नाहीत. शिवाय त्यामधील वाक्यरचना व शब्दप्रयोग अतिशय क्लिष्ट आणि कोणासही न समजणारे असे वापरले जातात.. विविध स्तरांवर संदिग्धता ठेवण्यात काही विशिष्ट् हेतूही जाणवतात. त्यामुळे करदात्यांना कितीही त्रास झाला तरी अधिकार्यांना नामानिराळे राहता येते. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या निर्णयामुळे आश्चर्य वाटते.
यासाठीच यापुढे करविषयक कायद्यातून सर्वप्रकारची निसंदिग्धता राहील याकडे अर्थमंत्री, अर्थसचिव,कर मंडळाचे अध्यक्ष आणि कायदा मंत्रालयातील सर्व उच्चाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्या संदिग्ध तरतुदीमुळे जर कोणतीही कोर्टबाजी होणार असेल तर त्याला प्राथमिक दृष्ट्या अधिकार्यांनाही जबाबदार धरण्याची गरज आहे असे झाले तर क्लिष्ट आणि त्रासदायक कर कायद्यापासून सामान्य नागरिक वाचेल यात शंका नाही.

 नागलंद भारताचा उत्तर पूर्व भाग असून त्याचा औद्योगिक-व्यापारी दृष्टीकोनातून विकास होणे महत्वाचे आहे. सीमा रेषेवर असल्याकारणाने नागालँड विकास होणे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य नागालँडच्या विकासासाठी महाराष्ट्रातील उद्योजकांनी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करावी. नागालँडमध्ये उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून तेथे उद्योगवाढीसाठी प्रयत्न करावे यासाठी आवश्यक सर्व सहकार्य नागालँडतर्फे करण्यात येईल.महाराष्ट्रातील व्यापारी उद्योजकांनी नागालँडमध्ये असलेल्या व्यापार-उद्योगांच्या संधीचा फायदा घ्यावा व सहकार्य करावे असे आवाहन नागालँडचे राज्यपाल मा.श्री पद्मनाभ आचर्य यांनी केले. दिनांक २७ जुलै २०१८ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्री.......च्या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत होते.

चेंबरच्या मुंबई येथील डहाणूकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल श्री पद्मनाभ आचर्य यांचे समवेत नागालँडचे मार्को फेद्चे चेअरमन डॉ.एम छुबा,चेम्बरचे अध्यक्ष श्री.संतोष मंडलेचा, चेंबूरचे माजी अध्यक्ष हेमंत राठी, सौ.मीनल मोहाडीकर व्यासपीठावर उपस्थित होते.
महामहीम आचार्य पुढे म्हणाले की, भारताच्या दृष्टीने उत्तर पूर्व भाग महत्वाचा आहे.त्याठिकाणी उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा उपयोग औद्योगिक विकासासाठी व्हावा, रोजगार निर्मिती व्हावी असे सांगितले. याठिकाणी अन्नप्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु करता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबरने यासाठी पुढाकार घ्यावा, नागालँड प्रगतीशील राज्य व्हावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी तंत्रज्ञानाची देवाण घेवाण करावी व नागालँडमधील उद्योग कसे वाढतील यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस चेम्बरचे अध्यक्ष मंडलेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी चेंबरच्या कार्याची माहिती दिली तसेच त्यांनी सांगितले की सन २०१४ मध्ये चेंबरच्या प्रतिनिधी मंडळाने नागालँडचा दौरा केला, तेथील भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध साधन सामुग्री, जनजीवन यांचा अभ्यास आम्हास करता आला, नागालँडचे सौंदर्य अप्रतिम आहे, पर्यटनासाठी याठिकाणी मोठा वाव आहे., चेंबर निश्चित नागालँडमध्ये व्यापार व उद्योगाचे दृष्टीने पर्यटना करेल. या वेळी नागालँडचे राज्यपाल श्री आचर्य यांचा श्री मंडलेचा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुरेश साठे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. सुरेश साठे आणि अतुल कुळकर्णी हे गेल्या अनेक वर्षांपासून नागालँड सरकार व महाराष्ट्र चेंबर यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका बजावत आहेत. विविध सभा आयोजित करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता, या दोघांचाही सत्कार करण्यात आला.
चेम्बारचे माजी अध्यक्ष हेमंत राठी यांनी यावेळी आपल्या मनोगतातून नागालँडमध्ये व्यापार उद्योगासाठी की करता येईल, परस्पर संबध कसे वाढवता येतील या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले.
उपस्थित उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ एम.छुबा व राज्यपाल आचार्य यांनी उत्तरे दिली. शेवटी चेंबरच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी आभार व्यक्त केले. चेम्बरचे प्रभारी कार्यवाह सागर नागरे यांनी सूत्रसंचालन केले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division