जय गद्रे यांचा स्वयंचलित अग्निशामक रोबो

jay gadreअसं म्हणतात की आयुष्यातलं आपलं ध्येय निश्चित करणं, हे ध्येयप्राप्तीच्या दिशेने पडणारं पहिलं पाऊल असतं. रोबोटिक्सची विशेष आवड असणाऱ्या जय गद्रे या तरुण उद्योजकाला भेटल्यावर याची प्रचिती येते. विज्ञान संशोधन आणि नवनिर्माण क्षेत्रात काम करायचं असं त्याने खूप लहान वयातच पक्कं ठरवलं होतं आणि इंजिनिअरिंगची पदवी हातात पडण्याआधीच आता त्याने स्वतःची कंपनी स्थापन करून व्यवसायाला सुरुवातही केली आहे.

जमनाबाई नरसी शाळेचा विद्यार्थी असलेल्या जयने, बारावीनंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅण्ड येथे प्रवेश घेतला. मात्र दोन वर्षांतच ते शिक्षण सोडून तो भारतात परतला. यामागचं कारण सांगताना तो म्हणाला, " माझ्या डोक्यात खूप आयडिया होत्या आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी मी खूप उत्सुक, उतावीळ होतो. अमेरिकेत शिकताना प्रयोग - संशोधन - ट्रायल घेऊन बघणं शक्य होत नव्हतं. पण सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी मी भारतात आलो तेव्हा लक्षात आलं की इथेच ते शक्य आहे. मग विचार केला, कशाला वेळ फुकट घालवायचा? आई - बाबांशी बोललो आणि अमेरिका सोडून इथे परतलो. मात्र पदवी पूर्ण केलीच पाहिजे असा त्यांचा आग्रह असल्यानेमुकेश पटेल कॉलेज ला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतला. आता मी शेवटच्या वर्षात शकतो आहे. कॉलेज व्यतिरिक्त जो वेळ मला मिळतो त्यात मी आमच्या वर्कशॉपमध्ये रोबोटिक्स बेस्ड नवनवे प्रॉडक्ट बनवण्यासाठी प्रयोग करतो."

जयचे वडील (सतीश गद्रे) मेकॅनिकल इंजिनिअर असून विविध औद्योगिक क्षेत्रांना त्यांच्या गरजांनुसार फायर एस्टींग्विशिंग सिस्टीम उपलब्ध करून देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. लहानपणापासून हे सर्व पाहणार्या जयने, आपल्या ब्लूजे रोबोटिक्स कंपनीच्या नावाने जो पहिला रोबो बनवला तो म्हणजे स्वयंचलित अग्निशामक रोबो! आग विझवण्यासाठी 60 मीटर दूरवरून फोम अथवा पाण्याचा मारा करू शकणारा, 20 मिनिटे पुरेल इतका फोम टॅन्क असणारा, 360 अंशात फिरणारा हा स्वयंचलित रोबो त्याने एका ग्राहकाच्या विशिष्ट गरजेनुसार बनवला होता. आता त्याचे एक स्टँडर्ड मॉडेल बनवून व्यावसायिक उत्पादन करण्याचा जयचा विचार आहे. याशिवाय जयने सोलर ट्रॅकिंग सिस्टीम ही तयार केली आहे. ड्युएल अॅाक्सिसची, सूर्यफुलाप्रमाणे वळणारी पॅनेल्स हे याचे वैशिष्ट्य असून इतरांच्या तुलनेत 40 टक्के अधिक कार्यक्षम आहेत.

दरम्यान जयचे आणखी एक अनोखे प्रॉडक्ट अंतिम टप्प्यात आहे आणि ते म्हणजे जिने चढू - उतरू शकणारी व्हीलचेअर ! येत्या एक - दोन महिन्यात याचे प्रोटोटाईप मॉडेल तयार होईल आणि मग लगेच त्याचे उत्पादन सुरु होईल. ही चेअर अत्यंत युजर फ्रेंडली असून खूप लोकांना फायदा होईल असा जयला विश्वास आहे. तो म्हणतो, " रोबोटिक्सवर आधारित अशा पद्धतीची काही प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आहेत. पण ती विदेशी बनावटीची आणि महाग आहेत. ब्लूजे रोबोटिक्सच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांच्या गरजा भागवणार्याि आणि परवडणाऱ्या रोबोटिक सिस्टीम्स तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे."

जगप्रसिद्ध उद्योजक - गुंतवणूकदार - संशोधक इलॉन मस्क यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जयवर खूप प्रभाव आहे. त्यांच्यासारखंच काहीतरी भव्यदिव्य करण्याचं त्याचं स्वप्न आहे. वयाच्या अवघ्या एकवीसाव्या वर्षी स्वतःची कंपनी स्थापन करून, संशोधन करून नवनवी प्रॉडक्ट तयार करणार्याय जयचे स्वप्न पूर्ण होईल आणि भविष्यात तो गरुडझेप घेईल, हे निश्चिवत !!

- प्रज्ञा काणे
9869547577

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division