अर्थशास्त्र निपुण- डॉ. अविनाश दीक्षित

Dixit2016 सालच्या पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी डॉ.अविनाश कमलाकर दीक्षित हे अमेरिकन भारतीय अर्थशास्त्रज्ञ असून अर्थशास्त्रविषयक व गेम थियरी विषयाचे संशोधक व अध्यापक आहेत.

1944 चार जून महिन्यात मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात डॉ. दीक्षित यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कमलाकर दीक्षित हे मुंबई विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते आणि मातोश्री कुसुम दीक्षित उत्तम शिक्षण असलच पाहिजे या मताच्या होत्या. सुदैवाने अविनाश यांना तल्लख बुद्धीचे वरदान होतं. इतकी तल्लख की दोन इयत्तांचा अभ्यास एकाच इयत्तेत करून वयाच्या पंधराव्या वर्षीच आपलं हायस्कूल शिक्षण पूर्ण केलं.शालेय शिक्षण गिरगाव येथील आर्यन शाळेतून करून दोन वर्ष जयहिंद कॉलेजमध्ये काढल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कॉलेजमधून गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन बीएस्सी केलं. अंतिम परीक्षेत त्यांनी पैकीच्या पैकी ६००/६०० मार्क मिळवण्याचा व न तुटणारा विक्रम केला.

अविनाश यांना गणिताची मनापासून आवड कुठल्याही क्षेत्रातील समस्येचे उत्तर ते गणिती पद्धतीने शोधू पाहतात. त्यांनी गणितातील पदवी मिळवली त्याकाळात गणिताचे सिद्धांत लावून अर्थशास्त्रातील ग्रहण कोडी आपण सोडवू शकू अशी आशा उत्पन्न झाली होती व त्यांना त्यात थोडेफार यशही प्राप्त होत होते.डॉ. दीक्षित यांना पद्युत्तर शिक्षण घेण्यात स्वारस्य होतं आणि त्याला आश्वासक वातावरणही घरात होतं. संशोधन कार्य आणि विद्यापीठातील प्राध्यापकी हा उदात्त पेशा असला तरी चांगला पगार मिळण्याचा तो काळ नव्हता. म्हणून मग त्यांनी अमेरिका व ब्रिटन येथे पुढील शिक्षणासाठी जायचं ठरवलं. 1965 मध्ये केंब्रिज विद्यापीठातील कॉपर्स क्रिस्टी कॉलेजमधून त्यांनी गणित विषयात बीए केलं त्यात ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. 1968 मध्ये त्यांनी एमआयटी मधून अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदवी संपादन केली. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी पीएचडीची पदवी प्राप्त करणे ही आजपर्यंत फारच थोडक्यांना जमलेली दुर्मिळ गोष्ट आहे.
त्यांचे संशोधनाचे विषय आहेत सूक्ष्म अर्थशास्त्राचा सिद्धांत, गेम थियरी, आंतरराष्ट्रीय व्यापार, औद्योगिक संस्था, वृद्धी व विकास सिद्धांत, सार्वजनिक अर्थशास्त्र, राजकीय अर्थव्यवस्था आणि नवीन संस्थात्मक अर्थशास्त्र.

जोसेफ स्टीग्लिटझ सहलेखक असलेल्या मोनोपाॅलिस्टीक काॅम्पिटिशन अॅड प्रोडक्ट डिव्हसिॆटी ह्या त्यांच्या लेखनाला अर्थशास्त्रीय जगात खूप मान आहे. मोनोपाॅलिस्तिक काॅम्पिटिशन ही अशी एक संकल्पना आहे ज्यामध्ये शुद्ध मक्तेदारी व निर्दोष स्पर्धा या दोहोंच्या मधली, प्रत्यक्ष तत्त्वावर आधारलेली अवस्था वर्णन केली आहे. शुद्ध मक्तेदारी असली की एकच कंपनी पूर्ण बाजारपेठेला वेठीस धरते परंतु निर्दोष स्पर्धा असली की त्यात बऱ्याच कंपन्या सहभागी होत असल्यामुळे बाजारपेठेवर कुणा एकाची पकड राहत नाही. दीक्षित मॉडेल म्हणून ओळखली जाणारी ही संकल्पना आंतरराष्ट्रीय व्यापार अर्थशास्त्रीय वृद्धी विकास व अर्थशास्त्रीय भूगोल या प्रचंड व्याप्तीच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतांना आधारभूत ठरते. गेम थियरी या अर्थशास्त्रात लोकप्रिय झालेल्या सिद्धांताचे डॉ. दीक्षित हे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेम थियरी ही अर्थशास्त्रातील मूलभूत संरचना बनली आहे. गेम थिअरी म्हणजे डावपेचांच, कुरघोडी शास्त्र, डावपेचांच्या शृंखलेमध्ये 'खेळाडूंनी' कोणता डाव खेळावा जेणेकरून उत्तम निष्पत्तीचे फासे त्यांच्या घरात पडतील हे अगदी अचूकपणे व दृष्ट्या ठरवणार हे शास्त्र आहे. या शास्त्राच्या अभ्यासाचा पल्ला बुद्धीबळापासून ते बालसंगोपनातपर्यंत आणि टेनिस ते कंपन्यांचे अधिग्रहण इतका विस्तृत आहे. गेम थिअरीचा सिद्धांत समजावून सांगणे व शिकवणी विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायी मौजेचा अनुभव असावा असा डॉ. दीक्षित यांचा आग्रह असतो. शिक्षण कौशल्यासाठी त्यांना आजपर्यंत कितीतरी पुरस्कार मिळाले आहेत. युनिक विद्यापीठातील सेंटर फोर इकॉनोमिक स्टडीज तर्फे 1994 मध्ये डॉ. दीक्षित यांना प्रथम सीईएस पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयएमएफ व रस्सल सेज फाउंडेशनमध्ये व्हिजिटिंग स्कॉलरचा दर्जा त्यांना प्राप्त आहे. 2001 मध्ये उपाध्यक्ष व 2008 मध्ये अमेरिकन इकॉनाॅमिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 1992मध्ये अमेरिकेतील कला व विज्ञान अकादमी आणि 2005 मध्ये राष्ट्रीय विज्ञान अकादमी व डॉ. निवडून गेले. 2016 सालच्या जानेवारी महिन्यात भारताच्या राष्ट्रपतींनी डॉ. अविनाश दीक्षित यांना पद्मविभूषण या द्वितीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने अलंकृत केले. व्यावसायिक नियतकालिकांमध्ये त्यांचे शंभराहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

डॉ.दीक्षित यांच्या मते भारताचं आर्थिक भविष्य उज्वल असलं तरी त्यात जोखीम आहे कारण त्याला जबाबदार आहे अकार्यक्षम राजकारण, त्याचप्रमाणे भारतातील, विशेषतः ग्रामीण भागातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा दर्जा खूपच घसरलेला आहे. भारताला नुसत्याच मोठ्या कामकरी वर्गाची नाहीतर कुशल कामकरी वर्गाची गरज आहे आणि ते साध्य करण्यासाठी शिक्षण व स्त्रियांचा जास्तीत जास्त सहभाग या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं. भारतातील बँकांची स्थिती इतकी वाईट नाही राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नोकरशाहीचा अडथळा असला तरी काही खासगी बँका आधुनिक सुविधा देऊन अधिक समंजसपणे कार्यरत आहेत. निश्चलीकरण या योजनेमागचा तत्व बरोबर आहे मात्र अंमलबजावणी करणारी यंत्रणा अपुरी पडली. शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात भारताने चांगली सुधारणा केलेली आहे आणि त्यात डॉ.माशेलकरांच्या भगीरथ प्रयत्नांचे फार मोठा वाटा आहे.

ज्या मूल्यांवर, तत्त्वांवर दीक्षित यांची गाठ श्रद्धा आहे त्याचे शब्दांकन करायचं झालं तर असं म्हणता येईल धर्म, लिंग, नागरिकता,वांशिकता, धनसंपत्ती, गरिबी काहीही आड येऊ न देता प्रत्येक व्यक्तीस सन्मान आणि संभवनीय वागवले पाहिजे. आपण जितकं बोलतो त्याच्यापेक्षा जास्त ऐकण्याची सवय ठेवली पाहिजे. निसर्गाने म्हणूनच तर आपल्याला दोन कान आणि एकच तोंड दिले आहे. स्वतःच्या क्षमतेवर असीम विश्वास असायला हवा मात्र स्वमतांवर आणि निर्णय निवड याबाबत आग्रही असू नये. अर्थतज्ञ या नात्याने डॉ. दीक्षित यांच्या मते कुठलीही व्यवस्था दोषरहित नसते कधी बाजारपेठा अपयशी ठरतात तर कधी सरकार. परंतु दोहोंमधला श्रेयस्कर असा रस्ता काढला, दोघांमधील चांगलं ते घेऊन वाईटाचा त्याग केला आणि ब्रिटिश म्हणतात त्याप्रमाणे येनकेनप्रकारे गंतव्यस्थान गाठलं तर वाजवी यशाची प्राप्ती नक्की होते. तरुणांना ते आवर्जून सांगतात की चांगलं शिक्षण घ्या आणि वापर व परिवर्तनशील जगात यशस्वी होण्यासाठी कुठेही प्रभावी ठरेल असे लवचिक कौशल्य संपादन करा. तुमच्या बौद्धिक कुतूहलाचा चालना मिळेल असं काम करा शोधा.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division