आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकार सुधाकर प्रभू

sudhakar prabhuरचना आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रात सुधाकर प्रभू यांनी जे विलक्षण पराक्रम केले आहेत याचा पुरावा आहे त्यांना मिळालेले असंख्य पुरस्कार. यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा एशियन ब्रिटिश नागरिकास देण्यात येणारा ज्वेल जीवन गौरव पुरस्कार शिवाय इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनोमिक स्टडीज ऑफ इंडियातर्फे दिला जाणारा उद्योग रत्न पुरस्कार समाविष्ट आहे. 1995 पासून प्रभू यांची कंपनी फ्रिशमन प्रभू (इंडिया) प्रा. लि. भारतात एक बहुविध रचना सल्लागार म्हणून कार्यरत आहे. भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे ते करतात.
मुंबईतील किंग जॉर्ज हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण एल्फिस्टन कॉलेजमध्ये झाले. घरच्यांना त्यांनी डॉक्टर व्हावं असं वाटत असलं तरी वैद्यकीय व्यवसाय आपल्याला भावणारा नाही हे उमजून ते अभियांत्रिकी या शाखेत रुजू झाले. व्हीजेटीआयमध्ये त्यांना प्रवेश मिळाला.सुधाकरजींनी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केला तोही विद्यापीठातून पहिल्या क्रमांकाने.
सहा महिन्यांत करता लंडनला जाण्यासाठी वडीलांची परवानगी मिळाली. अनेक दिवस खस्ता खाल्ल्यानंतर ते मिळालेल्या जुजबी नोकरी सोडण्याच्या प्रयत्नात असताना लँड शायर येथील एका कंपनीकडून त्यांना नोकरीचा प्रस्ताव प्राप्त झाला. सुधाकरजी तिथे पोचले आणि काम सुरु केलं. त्यांना ती जागा आवडली. काही महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी तेथील जीवनपद्धती आवडू लागली आणि पुढील शिक्षण इंग्लंडमध्येच घेण्याचा त्यांचा निर्णय पक्का झाला.
सुधाकरजी ज्या विषयात तज्ञ होते त्याच्याशी संबंधित खरीखुरी नोकरी त्यांना मिळाली ती सी.जे.पेल अँड पार्टनर ह्या कंपनीत 1960 साली. पेल यांच्यासोबत सुधाकरजींच मेतकुट जुळलं आणि केवळ 32 वर्षांच्या तरुण वयात ते या कंपनीचे पगारी भागीदार झाले. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1970 साली ते भारतात परत आले. सुधाकरजींची प्रामाणिक इच्छा होती की त्यांनी जे आधुनिक शिक्षण घेतलं होतं आणि इंग्लंडमधील नोकरीत यांनी जे विशेष कौशल्य आत्मसात केलं होतं त्याचा फायदा त्यांच्या आपल्या देशाला म्हणजेच भारताला व्हावा. त्यांना स्वदेशाची सेवा करायचे होते भारतात परतल्यानंतर त्यांनी नोकरीचा शोध सुरू केला. अर्ज केल्यासरशी त्यांना गॅमन इंडियात नोकरी मिळाली. त्यांच्यासोबतच त्यांच्या इतकीच शैक्षणिक पात्रता असलेल्या एका गोऱ्या माणसालासुद्धा नियुक्ती मिळाली होती पण त्याला यांच्या दुपटीने पगार आणि इतर सोयीसुविधा दिल्या गेल्या होत्या. आपल्या स्वतःच्या देशात आपल्या स्वतःच्या माणसांकडे आपल्याविरुद्ध अशी भेदभावाची वागणूक आणि एका परकीय माणसाला झुकतं माप द्यायची कृती सुधाकरजींना दुखावून गेली.
आपली स्वतःची अभियांत्रिकी फर्म सुरू करण्याच्या पर्यायावर विचार सुरू केला पण अनेकवेळा बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे शिकार झाल्यामुळे त्यांचा टिकाव लागला नाही आणि निराश मनाने सुधाकरजींनी पुन्हा इंग्लंडची वाट धरली.
सी.जे.पेल मध्ये त्यांनी पुन्हा आपलं जुनंच काम सुरू केलं पण यावेळी बरोबरीचे भागीदार बनून. अभियांत्रिकी क्षेत्रातील खाजगी मालकीच्या मोठा आकार असलेल्या फार थोड्या कंपन्या इंग्लंडमध्ये शिल्लक आहेत, पेल फ्रिशमन अशापैकी एक. सुधाकरजींनी जेव्हा या फर्ममध्ये नोकरी सुरू केली तेव्हा येथे 35 लोकांचे मनुष्यबळ होते. आता त्यांच्याकडे हजार कर्मचारी असून त्यांची कंपनी अभियांत्रिकी क्षेत्रातील इंग्लंडमधल्या टॉप-20 कंपन्यांपैकी एक गणली जाते. त्यानंतर पेल फ्रिशमन कंपनीने सरकारकडून एक कंपनी विकत घेतली. तीन हजार लोकांचे मनुष्यबळ असलेली कंपनी संरक्षण विभागाच्या इमारती, गृहमंत्रालयाचे कार्यालय, राजवाडा, इत्यादीच्या रखवालीचे काम करीत असे. अचानक सुधाकर यांच्या कंपनीचा कर्मचारीवर्ग चार हजार पर्यंत वाढला. सगळं काही आलबेल असताना ऐंशीच्या दशकातील ग्रेट ब्रिटनने झेललेल्या मंदीच्या कठीण काळात अत्यंत सक्षमतेने कंपनीचे तारू पुढे नेले. वेळ इतकी नाजूक होती की कर्मचाऱ्यांचे पगार कमी करावे की सरळ कर्मचारी संख्या कमी करावी इथपर्यंत विचार करण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. यातील दुसरा उपाय दोन पेक्षा अधिक वाईट पर्याय होता. त्याकाळी कंपनीत 180 कर्मचारी कामावर होते. त्यांनी सर्वच्या सर्व 180 जणांना बोलावलं आणि सगळी स्थिती समजावून सांगितली. सगळ्याच कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने वीस टक्के पगार कमी करण्या स्वीकृती दिली. कालांतराने जेव्हा पैशाचा ओघ पूर्ववत झाला तेव्हा सुधाकररावांनी त्यांचे पगार पूर्वपदावर आणले. इतकेच नव्हे तर त्यात वाढ सुद्धा केली. त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी तीस ते पस्तीस टक्के मंडळी वीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्यांच्याबरोबर काम करत आहेत.
आर्थिक मंदीच्या काळात आलेल्या समस्यांवर मात करण्याच्या हेतूने सुधाकरजींनी त्यांच्या कंपनीचा पाया विस्तारण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पैसा निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रात शिरकाव करण्याचे ठरविले. 1980 च्या सुमारास त्यांनी रस्ते आणि वाहतूक क्षेत्रात काम करणारी लहान आकाराची एक सरकारी फर्म संपादित केली. नंतर तीच धडाडी कायम ठेवत त्यांनी मिल्टन केन्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीवर ताबा मिळवला. प्रभू आणि जे.पेल या दोघांनी कंपनी संपादित करून अशी उत्तम प्रकारे पुढे नेली त्याच्या कहाण्या मिल्टन कंपनीच्या कानावर आधीच पडल्या होत्या आणि म्हणूनच पेल फ्रिशमन कंपनीने त्यांची कंपनी चालवावी असे त्यांना वाटू लागले. मिल्टन केन्स ब्रिटनमधील मोठ्या शहरांपैकी एक शहर आहे. अशातर्हेने पेल फ्रिशमन ग्रुप नागरी विकासाच्या कामाकडे वळला आणि नंतर त्यांनी एका जल क्षेत्रातील कंपनीसोबत भागीदारी मिळवली. सुधाकरजींचे कंपनीचे रेल्वे, वॉटर अॅथाॅरिटी आणि लंडन डेव्हलपमेंट अॅथॉरिटीसोबत फ्रेमवर्क आहे. उदाहरण द्यायचं झालं तर हा करारात 4000 रेल्वे फुलांच्या तपासणीचा कार्य समाविष्ट आहे इंग्लंडला या क्षेत्रातील अतिशय सुंदर असा इतिहास असला तरी अनेक बांधकामे जुनी झाली आहेत. सुधाकरजींची कंपनी जुन्या बांधकामाची तपासणी करणे तपासणी करणे आणि त्यांना बळकट करणे अशा कामात व्यग्र आहे. हा करार आजही जीवित आहे
धातूच्या सपाट फळ्यांची लवचिकता व शक्ती या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास झाला आहे. संशोधनात्मक अध्ययनाच्या कार्यातही त्यांचा सहभाग राहत आला आहे. मोटारीच्या वाहतुकीच्या पुलांचे प्रमाणीकरण करणे आणि विलग करता येण्याजोग्या बहुमजली वाहनतळांच्या संशोधनात्मक अध्ययनाचे अहवाल त्यांनी ब्रिटिश स्टील कॉर्पोरेशनला तयार करून दिले आहेत.
1995 मध्ये सुधाकरजींनी फ्रिशमन प्रभू या भारतीय कंपनीचा प्रारंभ केला. तेव्हापासून त्यांनी भारतात बक्कळ काम केले आहे. त्यांनी भारतात केलेल्या कामांमध्ये मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग, सुवर्ण चतुष्कोण महामार्ग प्रकल्प याशिवाय गुजरात, तामीळनाडू आणि इतर अनेक राज्यातील कामांचा समावेश आहे. दिल्ली विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम त्यांनीच केले असून इतर अनेक लहान-मोठ्या, जवळपास अकरा विमानतळांची कामंसुद्धा त्यांनी केली आहेत. जवळपास अकरा विमानतळांची वाहतुकीचा क्षेत्रात त्यांचा आवाका मोठा आहे. दिल्ली मेट्रो प्रकल्पातील नवीन नऊ स्टेशन यासाठी त्यांनी काम केले असून दिल्लीत यांचे कार्यालय सुद्धा आहे कॉनेस्को इंटरनॅशनल ही सुधाकरजींची कंपनी मध्यपूर्वेत आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामाच्या कार्यात व्यग्र असते. मध्यपूर्वेतील त्यांचे उल्लेखनीय प्रकल्प आहेत ते म्हणजे सुप्रसिद्ध अॅटलांटीस हॉटेल, गोल्ड सौक इत्यादी. इराक देशाच्या पुनर्बांधणीत त्यांचा सहभाग होता. भोवताली बॉम्बचा वर्षाव सुरू असतानाच्या स्थितीत त्यांच्या माणसांनी न्यायालयं आणि पोलिस ठाण्यांच्या इमारतीची पुनर्बांधणी केली. सुधाकरजींच्या फ्रिशमन प्रभू कंपनीद्वारे आकाराला आलेल्या महत्वाच्या प्रकल्पांमध्ये बॉम्बे हाय, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, वानखेडे स्टेडियम, दिल्ली विमानतळ आधुनिकीकरण, जीजीभॉय टाॅवर, मुंबई स्टाॅक एक्सचेंज इमारत. नवी दिल्लीत आयोजित एशियाड खेळांसाठी एशियाड स्पोर्ट्स सिटी ज्यामध्ये बहुउद्देशीय क्रीडा संकुल ज्याची क्षमता 65 हजार प्रेक्षकांची आहे असे स्टेडियम शिवाय आदिवासी आणि हॉटेलसाठी च्या संकुलाचा समावेश असलेली संकुले इत्यादी बांधकामासाठी सुधाकरजींनी काम केले आहे. युरोपमधील सर्वात उंच इमारत नेटवेस्ट टॉवर 3 लिवर आधारावर उभारलेली ही इमारत सुधाकरजींच्या आवडत्या प्रकल्पांपैकी एक आहे. लंडनमधील सर्वाधिक खोली असलेले तळघर- आल्डसॆगेट स्ट्रीट, यू.के.मधील सर्वाधिक लांबीचा रेल्वे पूल- टे ब्रिज, हॉटेल अॅटलांटिस, दुबई 2000 बेडची उपलब्धता असलेलं हॉटेल ज्याचा काही भाग पाण्याखाली आहे. न्यू दुबई विमानतळ. गोल्ड सौक 6.2 दशलक्ष चौरस फुटांचे संकुल असे अनेक प्रकल्प सुधाकर प्रभू यांच्या कामात समाविष्ट आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division