भारतातून ‘आयफोन’ हद्दपार होण्याची शक्यता

iphone 20170911760जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅकपल आणि ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) यांच्यात डीएनडी अॅकपवरून सध्या वाद सुरू आहे. स्पॅम कॉलच्या रिपोर्टसाठी अॅडपलने डीएनडी अॅडप इन्स्टॉल करावे, अशी मागणी ट्रायने केली आहे. मात्र, अॅडपल युजर्सच्या गोपनीयतेसाठी अॅ पलने ट्रायची मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. अॅतपलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅनपला जागा दिली नाही, तर कंपनीला भारतीय बाजारपेठेपासून दूर राहावे लागेल, अशी घोषणा ट्रायने केली आहे.
ट्रायने २०१७ मध्ये फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेजचा त्रास मोबाईल वापरकर्त्यांना होऊ नये यासाठी या अॅ पची निर्मिती केली आहे. हे अॅलप सध्या अॅोन्ड्रॉईडच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. मात्र, अॅ पलने आपल्या आय स्टोअरमध्ये या अॅअपला जागा दिली नाही.
ट्रायने १९ जुलैपासून नवा नियम लागू केला आहे. यानुसार सर्व मोबाईल फोनमध्ये डीएनडी अॅेप इन्स्टॉल असावे, यामुळे फेक कॉल्स आणि स्पॅम मेसेज रिपोर्ट करण्याची परवानगी युजरला मिळू शकेल. ट्रायने नियमांचे पालन करण्यासाठी मोबाईल कंपन्यांना सहा महिन्यांची मुदतही दिली आहे.
त्यामुळे या निर्णयाने भारतातून ‘आयफोन’ हद्दपार होऊ शकतो? अॅ पलने कधीही थर्ड पार्टी अॅयप्सना आपल्या युजरचे कॉल आणि मेसेज वाचण्याची परवानगी दिलेली नाही. अॅरपलचे म्हणणे आहे की, डीएनडी अॅजप युजर्सचे कॉल आणि मेसेज रेकॉर्ड करण्याची परवानगी मागतो. त्यामुळे युजरची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. आता डीएनडी अॅवपच्या या भांडणात कोण नमते घेईल, हे पाहावे लागेल.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division