महाराष्ट्रात डिझेल ४ रुपयांनी स्वस्त

Diselमहाराष्ट्रात पेट्रोलपाठोपाठ डिझेलचे दरही लिटरमागे ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे प्रत्येकी अडीच रुपयांनी कमी करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ राज्यसरकारही अडीच रुपयांनी पेट्रोलचे दर करत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी स्वस्त झाले होते. पुन्हा फडणवीस यांनी डिझेलच्या किंमतीत लिटरमागे १ रुपया ५६ पैशांनी कपात करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे राज्यात आता डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे इंधन दरवाढीमुळे होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ होत होती. त्यातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने इंधनाच्या दरात अडीच रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. स्वत: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची घोषणा केली होती.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division