३१ जुलैला 'एमटीएनएल'चे 'बीएसएनएल'मध्ये विलीनीकरण

bsnl mtnl 635 0 0महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) कंपनीचे भारत संचार निगम लिमिटेड ('बीएसएनएल')मध्ये विलीनीकरण करण्यासाठी सरकारने ३१ जुलै तारीख निश्चित केली आहे.

एमटीएनएलला मार्च २००९ पासून गेल्या २५ तिमाहींपैकी २२ तिमाहींमध्ये नुकसान झाले आहे. फक्त सप्टेंबर २००९, डिसेंबर २०१३ आणि मार्च २०१४ या तीन तिमाहींमध्ये कंपनीने नफा मिळविला होता.

सप्टेंबर २०१४ मध्ये एमटीएनएलचे बीएसएनएलमध्ये विलीनीकरण केले जाणार होते. त्यावेळी कंपनी शेअर्स बायबॅकचा पर्याय पुढे ठेवण्यात येणार होता. परंतु एमटीएनएल कंपनीवर असलेले कर्ज आणि एमटीएनएल व बीएसएनएल या दोन्ही कंपन्यांमध्ये असलेल्या वेतनाच्या फरकामुळे ठराव मंजूर होणे आवश्यक आहे, असे बीएसएनएल संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division