संपादक
ज्ञानेश चांदेकर

बीई(धातुशास्त्र), बिझनेस मॅनेजमेंट व पत्रकारिता यात पदविका प्राप्त.
स्टील व धातु उद्योगातील तज्ज्ञ विश्लेषक, सल्लागार.
तेवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या 'चांदेकर बिझनेस मिडिया प्रा. लि.' या प्रकाशन संस्थेमार्फत 'महाराष्ट्राचे उद्योगविश्व', 'आम्ही पार्लेकर' या मराठी नियतकालिकांखेरीज 'स्टीलवर्ल्ड' व 'मेटलवर्ल्ड' ही इंग्रजी मासिकेदेखील प्रसिद्ध केली जातात. तसेच उद्योगविषयक विश्लेषणावर आधारित रिपोर्ट्स तयार केले जातात. याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून देशविदेशात बी२बी एक्झिबिशन्स, कॉन्फरन्सेस यांचे यशस्वी आयोजन करण्यात येते.

संपादकीय मंडळ
डॉ. चंद्रहास देशपांडे

अर्थतज्ज्ञ म्हणून भारत सरकारच्या १२व्या नियोजन आयोगाचे कार्यकारी सभासद, 'टाटा सर्विसेस'मध्ये अर्थशास्त्र व संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे (MEDC) कार्यकारी संचालक, जागतिक व्यापारी केंद्राचे (WTC) संशोधक विभागाचे संचालक अशा महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत.
गेल्या २५ वर्षांपासून वृत्तपत्रांमधून अर्थशास्त्रीय विश्लेषण करणारे लेख प्रसिद्ध.

डॉ. प्रदीप बावडेकर
एमबीए, पीएचडी (मार्केटिंग मॅनेजमेंट)
मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनियरिंग सर्व्हिसेस लि. चे कार्यकारी संचालक (१९९५ पासून).
'मिटकॉन'तर्फे विविध उपक्रमांच्या व प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योगक्षेत्राच्या विकासात मोलाचा वाटा. १५ वर्षांहून अधिक काळ ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स, प्लास्टिक व केमिकल इक्विपमेंट्सच्या उत्पादन, वितरण व जाहिरातक्षेत्रात कार्यरत. दशकापेक्षा अधिक काळ व्यवस्थापन व तांत्रिक सल्लागार म्हणून यशस्वी कारकीर्द.

मुकुंद कुलकर्णी
बीई(मेकॅनिकल), एमबीए मार्केटिंग (सुवर्णपदकाचे मानकरी)
इंजिनियरींग डिझायनिंग, सॉफ्टवेअर, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस क्षेत्रातील 'एक्स्पर्ट ग्लोबल सोल्युशन्स प्रा. लि.' या 'महाराष्ट्र आयटी अॅवॉर्ड २००७' विजेत्या कंपनीचे संचालक.
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर, आयटी आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशन या संस्थांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्याबरोबर उद्योगक्षेत्र विकासासंबंधी कार्य करणार्‍या अनेक संस्थांशी संलग्न.

डॉ. मंगेश कश्यप
प्रमुख कार्यवाह, इंडो-ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर, संचालक, डी वाय पाटिल युनिव्हर्सिटी (पुणे), संशोधन विभागप्रमुख, न्युज रिसर्च ब्युरो, नवी दिल्ली, कार्यकारी संचालक, अथर्व कम्युनिकेशन्स. १९९४ पासून 'एन्व्हायर्नमेंट ऑब्झर्वर' हे आंतरराष्ट्रीय नियतकालिक सुरू केले तसेच (सोसायटी फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, रिसर्च अॅण्ड मॅनेजमेंट) या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळून पर्यावरण- संवर्धन क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी.

निर्मिती प्रमुख
अनिता चांदेकर

संपादकीय सहाय्य
भाग्यश्री महाजन

सजावट व मांडणी
शशांक शिवगण

रेखाचित्रे
श्रीनिवास प्रभुदेसाई

जाहिरात व्यवस्थापन
चंदना पाटील - सोलंकी 

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division