एप्रिल - २०१७ 

उद्योगविषयक घडामोडी

बातचित

mandar bharde

एअर अॅम्ब्युलन्स सेवा ही आजच्या काळाची गरज आहे.

- मंदार भारदे (संचालक, मॅब एव्हिएशन)

विमानसेवा म्हटलं की त्याकडे श्रीमंतांची चैन अशाच दृष्टीने पाहिलं जातं. मात्र या सेवेला आरोग्यसेवेशी जोडून "मॅब एव्हिएशन' तर्फे एअर अॅ्म्ब्युलन्स ची सुविधा पुरवली जाते. या अनोख्या व्यवसायाविषयी या कंपनीचे संचालक मंदार भारदे यांच्याशी बातचित केली आहे चित्रा वाघ यांनी... अधिक वाचा

संपादकीय

राजकारण व उद्योग जगत ही दोन भिन्न क्षेत्रे असली तरी एकमेकांवर नेहमीच प्रभाव टाकत आली आहेत. राजकीय नेतृत्व केवळ उद्योग जगताशी निगडित कायदे करते म्हणून नव्हे तर भारतासारख्या देशामध्ये अनेक मोठ्या उद्योगांची मालकी सरकारकडे आहे. सरकारी पैशातून उभ्या राहिलेल्या अनेक मोठ्या प्रकल्पांमुळे नोकरी व्यवसायाच्या संधी निर्माण होतात, जनतेची क्रयशक्ती वाढते व पर्यायाने अर्थव्यवस्थेच्या गाडीचा वेग वाढण्यास मदत होते. जर राजकीय स्थैर्य असेल तर व तरच उद्योजक भविष्याकडे आशेने बघू शकतो, नेहमीपेक्षा थोडा जास्त धोका पत्करू शकतो...अधिक वाचा

माहिती

GST image

जीएसटी - प्रगतीच्या दिशेने मोठी झेप

- उदय तारदाळकर

वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीकडे आर्थिक क्षेत्रातील स्वातंत्र्यानंतर सर्वात महत्वाचे पाऊल म्हणून बघितले जाते. जगात अनेक देशांमध्ये असा कर लागू आहे परंतु आपल्या देशातील संघराज्य पद्धत आणि विविध राज्यांमधील आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन नवी करप्रणाली निर्माण केली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून काही रचनात्मक बदल सुचवून एक मोठी झेप घेतली आहे... अधिक वाचा

विवेचन

Indian Industry

भारतीय उद्योजकतेची कथा आणि व्यथा - भाग १

जगाचा एकूण व्यापार बघता त्यामध्ये भारतीय उद्योजकांचा वाटा नगण्य का आहे हे आपण समजावून घेऊ. मुळात भारतात उद्योजकता ही राष्ट्रीयतेच्या भावनेतून किंवा सामाजिक भावनेतून उदयास आलेली आहे. या उद्योजकतेच्या मागे औद्योगिक क्रांती किंवा प्रखर भांडवलशाही नव्हती आणि प्रखर चंगळवादी  समाज पण नव्हता. त्यामुळे कसलीही विशेष स्पर्धा न करता ‘सरकारी सामंजस्याने’ आपल्या ह्या देशातील उद्योजकता फक्त भारतातील जनतेसाठीच उभी राहिलेली आहे. साहजिकच, मुद्दाम आटापीटा करून व स्पर्धा करून जगाच्या व्यापारात भाग घेणे व महत्त्वाचे स्थान पटकावणे  हा महत्वाकांक्षी विचार आपल्या उद्योजकांच्या मनात आलेला नाही... अधिक वाचा

माहिती

javle

Your Intelligence, Your Property, Your Right

Final Part

- Kaustubh J. Javle

Greetings readers and thank you for coming back to read the fourth and the final part of the ‘Your Intelligence, Your Property, your Right’ series, where I will conclude my attempt to introduce you with the remaining types of Intellectual Properties... Read More

हास्य उद्योग

cartoon april 17

वृत्तविशेष

Mudra Bank Logo

मुद्रा बँक योजनेतून 33 लाख लोकांना वितरण  

पंतप्रधान मुद्रा बँक योजनेअंतर्गत महाराष्ट्रात २०१६-१७ मध्ये १६ हजार ९७६ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असून ते २०१५-१६ च्या १३ हजार ३७२ कोटी ४२ लाख रुपयांपेक्षा ३ हजार ६०४ कोटी ३४ लाख रुपयांनी अधिक आहे... अधिक वाचा

विश्लेषण

indian industry 2

उद्योग आणि सहकार

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१६-१७ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत..... अधिक वाचा