फेब्रुवारी - २०१९

उद्योगविषयक घडामोडी

बातचीत

Lakshvedhi

मल्टी कमोडिटी एक्सचेंजचे लक्षवेधी डायरेक्टर आणि सीईओ

- मृगांक परांजपे 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजचे (MCX) विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. मृगांक परांजपे या आपल्या पार्लेकरांची लक्षवेधी ओळख आज आपण करुन घेऊया.वडील रेल्वेत लखनऊ येथे नोकरीला त्यामुळे शालेय शिक्षण व ज्युनियर कॉलेज लखनऊ येथेच झाले. पुढे आय आय टी पवई ला इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या नंतर आय आय एम अहमदाबाद येथे त्यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले व कॅम्पसमधून सिटी बँकेत रुजू झाले. त्यानंतरची सर्व करिअर फायनान्स मध्ये झाली..........अधिक वाचा

संपादकीय

 नुकताच पियुष गोयल ह्यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या अर्थसंकल्पाला विशेष महत्व आहे. ह्या अर्थसंकल्पात निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शेतकऱयांना झुकते माप दिले आहे असे मत अनेक स्तरातून व्यक्त होत आहे. यातील वास्तव काय आहे?

    गेला मोसम वगळता त्या आधीच्या काही वर्षात पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. शेतीचे उत्पन्न सुद्धा वाढते होते. असे असून सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. ह्यामुळे सरकारच्या एकूण शेती विषयक धोरणावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे..........अधिक वाचा

विशेष लेख 

पुण्यात वाहनांचा सुळसुळाट

भारत हा सध्या जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. हे आता आपल्या देशातील तसेच जगातील सर्वांनाच माहिती आहे. मात्र जगातील दुचाकी वाहनांची सर्वात मोठी बाजारपेठही भारत आहे, हे फार कमी लोकांना माहिती असेल. नुकत्याच झालेल्या एका पाहणीत ही बाब लक्षात आली आहे. जगाचा विचार करता भारतात सर्वाधिक दुचाकी वाहने विकली जातात यामध्ये पुण्याचा नंबर पहिला लागतो. आता याचा अभिमान बाळगायचा की नाही हे प्रत्येकाने ठरवावे.....अधिक वाचा

वृत्तविशेष

Joshi

'आडव्या तेल विहिरींच्या' तंत्रज्ञानाचे व'जोशी समीकरणा'चे जनक

- डॉ.सदानंद जोशी

भारतात उत्तम व्यवसाय करून भारताबाहेरही व्यवसाय वाढवण्याची आशा बाळगून यशस्वी होऊ इच्छिणार्यांसाठी दुबई मध्ये संपन्न होत आहे एक खर्या अर्थाची व्यावसायिक चळवळ म्हणजे  'महाबीझ'.  १२ ऑक्टोबर २०१८ रोजी दुबईत संपन्न होणार्यात 'महाबीझ' द्वारे  आफ्रिका आणि GCC देशांमधील मान्यवर उद्योजकांशी थेट संपर्क करण्याची एक महत्वाची संधी याद्वारे उपलब्ध होत आहे. यामुळे अनेक उद्योजकांना आपला  उद्योग विस्तार करण्याबरोबरच आयात व निर्यात वाढवण्यासाठीही या कार्यक्रमाचा  नक्कीच  फायदा होईल......अधिक वाचा

माहिती

scan0002

'NEXT' still building solutions

The company founded by MGM (Mahatma Gandhi Mission Trust) group.

Next is a dominant player in Modular Furniture Industry and Pre-engineered Steel Buildings

Order Finalization phase 

Next representative meets the client/consultant and get the technical details of the project requirement.

Contact proposal along with proposal drawings is submitted.

Finalize all techno commercial points and contract document is signed is with Next...... Read More

हास्य उद्योग

cartoon feb 19

विवेचन

piyush

२०१९ केंद्रीय अर्थसंकल्प – तरतुदी आणि प्रतिक्रिया

२०१९ चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सध्या अर्थखात्याचा हंगामी पदभार सांभाळणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला. हा १४ वा अंतरिम अर्थसंकल्प होता. सरासरी जनमत आणि अर्थक्षेत्रातील जाणकार यांच्या मते २०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्प हा नजीकच्या काळात होणार्या  निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन केला गेल्याचं प्रामुख्याने दिसून येत आहे. छोटा शेतकरी वर्ग आणि श्रमजीवी कामगार वर्ग यांना ह्या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला असून मध्यमवर्गीय व लघुउद्योजक यांच्या पारड्यात मात्र विशेष सवलती दिल्याचे दिसून येत नाहीये......अधिक वाचा

विश्लेषण

technologyservices

सामुहिक प्रोस्ताहन योजना

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१७ – १८ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत..... अधिक वाचा