'जीएसटी' १ एप्रिलपासून लागू करण्याची अर्थमंत्र्यांची इच्छा

gst tax malaysiaकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) १ एप्रिल, २०१६ पासून लागू करण्याची इच्छा व्यक्त केली व सर्व पक्षांनी जीएसटी विधेयकसाठी सहमत दर्शविली आहेजेटली यांनी इकोनॉमिस्ट इंडिया समिट २०१५ मध्ये बोलताना हे सांगितले.

जेटली म्हणाले, ‘‘जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला स्थान निर्माण करण्याची सध्या चांगली संधी आहे. देशाने आता कामाला लागले पाहिजे, तेव्हाच आपल्याला विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसता येणार आहे. जागातिक अर्थव्यवस्था सध्या हेलकावे खात आहे, मात्र भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे काम करत आहे. जनतेचे मत आमच्या बाजूने आहे. विरोधी पक्षाने संसदेत ज्याप्रकारे कामकाज होऊ दिले नाही, त्यावर जनतेचे लक्ष आहे. जनतेची देखील संसदेत कामकाज चालावे हीच अपेक्षा आहे. सरकार विरोधी पक्षांच्या दबावाखाली नाही. काळा पैसा परत आणण्यास सरकार वचनबद्ध आहे. आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत. शिवाय आवश्यक ती सर्व ठोस पावले उचलली जात आहेत.‘‘

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division