स्मार्टफोन अ‍ॅपद्वारे विदेशी चलन रूपांतरण शक्य!

unnamedसध्याच्या जागतिक अर्थ-अस्थिरतेच्या वातावरणात, देशोदेशींच्या चलनांच्या विनिमय मूल्यात दिवसागणिक तीव्र स्वरूपाचे चढ-उतार सुरू आहेत. अशा समयी विदेश सफरीसाठी, विदेशात शैक्षणिक व अन्य कारणाने नियोजित खर्चासाठी ग्राहकांना परकीय चलन हे सर्वोत्तम विनिमय मूल्यात तेही इच्छित ठिकाणी म्हणजे अगदी घरपोच मिळविणे ‘एफएक्स कार्ट’ या मोबाइल अ‍ॅपद्वारे शक्य बनले आहे.

चलन विनिमयाच्या महत्त्वाच्या पण विस्कळीत सेवेला सुव्यवस्थित व्यवसायाचे स्वरूप देणारी ही सेवा दुबईस्थित एफएक्स कार्ट डॉट कॉमने सुरू केली आहे. ‘एफएक्स कार्ट’ (Fxkart) अ‍ॅपने गल्लोगल्ली फॉरेक्स डीलरचे दुकान थाटून बसलेल्यांना एका सामाईक व्यासपीठावर एकत्र आणले आहे.

बँका आणि विमानतळावरील चलन विनिमय केंद्रे आणि स्वतंत्र डीलर यांचे विनिमय दर यांत, तसेच आजूबाजूला असणार्‍या फॉरेक्स केंद्रांचे दरही वेगवेगळे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कुणाकडून आपल्याला हवे ते चलन सर्वोत्तम दरात मिळू शकेल, याची ग्राहकांना एफएक्स कार्टद्वारे सहजपणे माहिती उपलब्ध होणे मोलाचे ठरू शकते.

एफएक्स कार्टच्या जाळ्यात देशभरातील ५००हून अधिक विदेशी चलन विनिमयकर्ते समाविष्ट झाले असून, यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून वैध परवाना मिळविलेल्या वितरकांचीच निवड केली जाईल, याची पुरेपूर काळजी घेतली गेली असल्याचे समजते.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division