"फोक्सवॅगन"चा प्रदुषण घोटाळा!

2000px Volkswagen logo 2012.svgफोक्सवॅगन कंपनीने वाहनातून होणार्‍या कार्बन व नायट्रोजन ऑक्साईड अशा घातक वायूंच्या उत्सर्जनाची खरी माहिती दडवून सॉफ्टवेअरच्या आधारे ती बनावट पद्धतीने सादर केल्याचे उघडकीला आले आहे. कंपनीच्या या पर्यावरण घोटाळ्याचा फटका सुमारे १ कोटी १० लाख वाहनमालकांना बसला आहे. जगभरातील वाहनमालकांची फसवणूक एवढीच या घोटाळ्याची व्याप्ती नव्हे, तर या बेजबाबदार वर्तनामुळे प्रदूषणाच्या मात्रेत तब्बल ४० पट वाढ झाल्याने लोकांच्या जिवाशीही कंपनीने खेळ केल्याचे दिसून आले आहे.

अमेरिकी सरकारच्या पर्यावरण विषयक एजन्सीने कंपनीवर नुकताच प्रदूषण घोटाळ्याचा ठपका ठेवला होता व याच अनुषंगाने फौजदारी गुन्हा दाखल करत त्याची चौकशी सुरू केली होती. या चौकशीदरम्यान कंपनीने या गैरप्रकाराची कबुली दिली होती. त्यानंतर, अमेरिकेतील पाच लाख वाहने माघारी बोलवण्याची घोषणा कंपनीने केली. प्राथमिक अंदाजानुसार कंपनीच्या अशा वाहनांची संख्या ही १ कोटी १० लाख इतकी आहे. या सर्व गाड्या ईए-१८९ डिझेल इंजिनच्या आहेत. गाड्यांचा परफॉर्मन्स वाढविण्यास कंपनीने सुधारित इंजिन विकसित केले. परंतु, या इंजिनमुळे प्रदूषणाच्या मात्रेत तब्बल ४० पट वाढ झाली. या इंजिनमधून नायट्रोजन ऑक्साईडसारख्या घातक वायूचा मोठा फैलाव झाला. हा वायू हवेत मिसळल्यास दमा, ब्रोन्कायटीससारखे दुर्धर आजार होण्याची शक्यता असते. सीईओ विन्टरकोर्न यांची गच्छंती घोटाळ्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन विन्टरकोर्न यांची गच्छंती झाली. त्यांच्या जागी पोर्श कंपनीचे मथायस मुल्लर यांची नियुक्ती करण्याची घोषणा कंपनीने केल्याची माहिती जर्मनीतील अग्रगण्य माध्यमांनी दिली आहे. कंपनीने गैरप्रकार केलेले ईए-१८९ हे इंजिन प्रामुख्याने फोक्सवॅगन गोल्फ, फोक्सवॅगन पसाट, फोक्सवॅगन जेट्टा, फोक्सवॅगन बीटल या चार मॉडेल्समध्ये आहेत. २००९ ते २०१५ अशा कालावधीत यांची निर्मिती झाली आहे. ही सर्व मॉडेल्स भारतामध्येदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील ग्राहकांची फसवणूक करतानाच प्रदूषणाची मात्रा वाढविण्यात कंपनीचा हातभार लागल्याचा कयास आहे. यासाठी कंपनीला १८ अब्ज अमेरिकी डॉलर इतका घसघशीत दंड होऊ शकतो.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division