उद्योगांना आता ऑनलाईन परवानगी

राज्यात उद्योग सुरू करBusiness World in Handण्यासाठी विविध विभागाच्या लागणार्‍या परवानग्या सात दिवसांच्या आत देण्यात याव्यात आणि परवानग्या देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. उद्योगांसाठी लागणार्‍या विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात याव्यात. काही विभागांच्या मान्यता मिळण्याची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण न झाल्यास त्या प्राप्त झाल्या आहेत असे समजण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी या वेळी दिले. जास्तीतजास्त उद्योगांना राज्यात आकर्षित करण्यासाठी परवाने देण्यासाठीची ऑनलाईन कार्यप्रणाली विभागाने २ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division