पश्चिम विदर्भामधील एमआयडीसीत दलालांचेच भूखंड अधिक

midc logo new 1 728पश्चिम विदर्भात एमआयडीसींमध्ये दलालांचेच अधिक भूखंड असल्याची माहिती उघडकीस आली आहे. दलालांच्या इशार्‍या वर एमआयडीसीचे यवतमाळ-अमरावतीपासून मुंबईपर्यंतचे अधिकारी धावत असल्याने ते म्हणतील त्यालाच एमआयडीसीत प्लॉट मिळत आहेत. सध्या दलालांच्या आडोशाने बहुतांश बीअरबार, हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनी हे प्लॉट हडपले आहेत.

एमआयडीसीत उद्योग सुरू न केलेले भूखंड परत घेण्याची भाषा केली जात असताना आजही अनेकांजवळ आठ ते दहा वर्षांपासून उद्योगाशिवाय भूखंड पडून आहेत असे समजते. फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या गाड्या, खताचे कारखाने यासाठी ते भाड्याने दिलेले आहेत. दलालांनी यवतमाळ, अमरावती व मुंबईच्या एमआयडीसी कार्यालयातील अधिकार्‍यांशी संगनमत केल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division