उद्योगानुकूल भारत १४२ वरून १३० व्या स्थानावर!

जागतिक बँकेच्या ‘डुइंग बिझनेस २०१६’ या अहवालात उद्योगानुकूलतेत भारताने १८९ देशांमधून १३० वे स्थान मिळविले आहे. देशात व्यापार-उद्योगास अडसर ठरणार्‍या गोष्टी वर्षभरात दूर करून उद्योगानुकूल वातावरणनिर्मितीत मोदी सरकार यशस्वी ठरले असल्याची ही पावती असल्याचे म्हटले जाते. ही कामगिरी दक्षिण आशियाई देशांमध्ये सर्वाधिक उठावदार आणि २००४ सालानंतर वार्षिक स्तरावर सर्वाधिक गुणात्मक प्रगती दर्शविणारी ठरली आहे. सुधारलेल्या या मानांकनाचे श्रेय मोदी सरकारने हाती घेतलेल्या विविधांगी सुधारणांना असल्याचे या अहवालाने स्पष्टपणे नमूद केले आहे. कंपनी कायद्यातील सुधारणा, नवउद्यमींना (स्टार्ट-अप्स) प्रोत्साहनाचे धोरण, कर-विवादांच्या निवारणाचे प्रयत्न, जुन्या वेगवेगळ्या ४४ कामगार कायद्यांचे चार कायद्यांमध्ये वर्गीकरणाची विविध राज्यांमध्ये झालेली अंमलबजावणी, मेक इन इंडिया तसेच डिजिटल इंडिया, स्किल इंडिया या घोषणांनी निर्माण केलेल्या वातावरण निर्मितीचेही कौतुक करण्यात आले आहे.

अव्वल १०० देशांच्या पंक्तीत भारत असेल
भारतासारख्या महाकाय अर्थव्यवस्था असलेल्या देशाने वर्षभराच्या कालावधीत १२ स्थाने वर चढून जाणारी कामगिरी करणे खरोखर ‘असामान्य’च आहे, असा कौतुकाचा शेरा जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ व वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू यांनी दिला. एका दमात ३०-४० स्थानांनी प्रगती करणारे देश आहेत, पण ते भारताच्या तुलनेत खूप छोटे देश होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तथापि व्यापार-उद्योगासाठी पोषक अर्थव्यवस्था असणार्‍या अव्वल १०० देशांच्या पंक्तीत भारताला पुढील वर्षी स्थान मिळविणे अवघड नाही, असेही त्यांनी सूचित केले. वस्तू व सेवा कायदा (जीएसटी) सह अन्य नियोजित आर्थिक सुधारणांची वाट मोकळी झाली, सरकारच्या प्रशासनिक खर्चाला कात्री व काटकसर असे उपाय योजल्यास हे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या मानांकनाला प्रभावित करणारे १० मुख्य घटक (कंसातील आकडा मानांकनाचा):

नकारात्मक..
उद्योगास प्रारंभ (१५५)
बांधकाम परवानग्या (१८३)
मालमत्तेची नोंदणी (१३८)
कर-भरणा प्रक्रिया (१५७)
करारमदारांचे पालन (१७८)

सकारात्मक..
गुंतवणूकदारांचे हितरक्षण (८)
पतसहाय्य मिळविणे (४२)
विजेची जोडणी (७०) ९९
सीमाबाह्य़ व्यापार (१३३)
दिवाळखोरीचे निवारण (१३६)

18. देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर मुंबईत
संगणकाधारित माहितीचे संकलन, जतन व विश्लेषणाच्या केंद्रांच्या (डेटा सेंटर) परिचालनातील नेटमॅजिक या कंपनीने मुंबईतील आपले पाचवे आणि देशातील सर्वात मोठे असे डेटा सेंटर सुरू करीत असल्याची घोषणा केली.

मुंबईच्या उपनगरात चांदिवली येथे स्वमालकीच्या पाच मजली इमारतीत, ३०,००० चौरस फूट चटईक्षेत्र असलेल्या या नवीन डेटा सेंटरची भर पडल्याने, कंपनीच्या देशातील एकूण नऊ डेटा सेंटर्सची एकूण क्षमता व चटई क्षेत्र सहा लाख चौरस फुटांपर्यंत विस्तारली आहे. उल्लेखनीय म्हणजे या महाकाय केंद्रातील ४० टक्के आसनक्षमतेची विधिवत उद्घाटनापूर्वीच विक्रीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे, अशी माहिती नेटमॅजिकचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ शरद सांघी यांनी दिली. ई-व्यापार क्षेत्रातील कंपन्यांच्या जवळपास ८० टक्के उलाढालींचे व्यवस्थापन व माहिती विश्लेषण, माध्यम कंपन्या, ग्राहकोपयोगी उत्पादने व सेवा कंपन्या तसेच पारंपरिक निर्माण उद्योगातील अनेक बडय़ा कंपन्यांना नेटमॅजिककडून सेवा दिली जात असून, नवीन केंद्रही अनेक स्टार्ट-अप्स कंपन्यांचा मुख्य कणा बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नेटमॅजिक ही एनटीटी कम्युनिकेशन्स या जपानी उद्योगसमूहातील एक उपकंपनी असून, एनटीटीकडून जगभरात विविध देशांत १४० डेटा सेंटर सध्या चालविली जात आहेत. एनटीटी कम्युनिकेशन्स समूहाने या नव्या केंद्रासाठी सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्रसंगी एनटीटी कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष व मुख्याधिकारी तेत्स्युया शोजी हेही उपस्थित होते. त्यांच्या कंपनीसाठी भारत ही एक महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे आणि म्हणूनच येथे २०१२ सालापासून २८ अब्ज येन (सुमारे १५०० कोटी रुपये) गुंतवणूक आपण येथे केली असून, यापुढे नवीन मालमत्तांचे अधिग्रहण, प्रस्थापित कंपन्यांच्या संपादनाच्या संधी पाहून गुंतवणुकीचा हा दर कायम राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division