सोन्यात ४५ टक्के भेसळ!

हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांमधील दिवसेंदिवस वाढत जाणारी भेसळ ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचली असल्याचे केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, सरकारने सोन्याच्या दागिन्यांबाबत २००१ आणि २००६ मध्ये सर्वेक्षण केले होते. पहिल्या सर्वेक्षणात सरासरी ८९ टक्के नमुने नापास झाले होते, तर दुसऱ्या सर्वेक्षणात ९० टक्के नमुने चाचणीत भेसळयुक्त ठरले होते. यातून सरासरी भेसळ ११ टक्क्यांनी वाढून १३.५ टक्क्यांवर गेली आहे. दागिन्यांमधील किमान भेसळ आधी ३८.६ टक्के होती. आता ती वाढून ४४. ६ टक्क्यांवर पोहोचली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division