एटीएम व क्रेडिट कार्डे आता अधिक सुरक्षित

एटीएम आणि क्रेडिट कार्डमधून होणारे गैरव्यवहार लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना ईएमव्ही ‘चिप’ असलेली क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ग्राहकांना देण्याचे आदेश दिले आहेत. एक सप्टेंबर २०१५ पासून हे कार्ड ग्राहकांना सुपूर्द करावेत, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

सध्या सार्वजनिक, खासगी क्षेत्रातील बँका आपल्या ग्राहकांना मॅग्नेटिक ‘चिप’ असलेली कार्डे देतात. या कार्डांमुळे मोठे गैरव्यवहार होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘ईएमव्ही चिप’ असलेली क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड पुरवावीत, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात म्हटले आहे. या नवीन कार्डासाठी लागणार्‍या सर्व पायाभूत सुविधा बँकांनी उभाराव्यात. त्याचबरोबर वस्तू खरेदी कराव्या लागणार्‍या दुकानांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. १ सप्टेंबर २०१५ नंतर सर्व डेबिट, क्रेडिट आणि नॅशनल व इंटरनॅशनल कार्डमध्ये ‘ईएमव्ही ‘चिप’ आणि ‘पिन’ वर आधारित कार्ड जारी करणे बंधनकारक आहे. ईएमव्ही च‌िप असलेली कार्डं अतिसुरक्षित समजली जातात. अशा क्रेडिट व डेबिट कार्डमुळे गैरव्यवहार होण्याची शक्यता नसल्याचे मानले जाते.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division