माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कामगारकपातीचे संकेत

information technologyइन्फोसिस, विप्रो आणि टीसीएस यांच्या पाठोपाठ भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या कॉग्निझन्टकडून ६,००० ते १०,००० नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत.

जगभरात एकूण २.६० लाख मनुष्यबळापैकी जवळपास २ टक्के नोकरदारांना कमी केले जाईल, असे अधिकृत सूत्रांकडून समजते. या प्रमाणात वाढीची शक्यताही नाकारता येत नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

विश्लेषकांच्या मते, माहिती—तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक पारंपरिक स्वरूपाची कामे व पदे ही वाढत्या स्वयंचलितीकरणातून अनावश्यक ठरत आहेत. शिवाय तंत्रज्ञानाचा झपाटय़ाने बदलत असलेला पट आणि नव्या धाटणीच्या डिजिटल सेवांकडील वाढता कल यातून भारतीय आयटी कंपन्यांना नवीन कंत्राटे मिळविणेही आव्हानात्मक ठरत आहे. भारतीय कंपन्यांकडून नव्हे तर जागतिक अग्रणी तंत्रज्ञान कंपन्यांकडूनही नोकऱ्यांना कात्री बसत आहे. सिस्कोने २०१७ सालात मनुष्यबळ ७ टक्कय़ांनी कमी करण्याचे, तर आयबीएमने ५,००० कर्मचाऱ्यांच्या कपातीचे नियोजन यापूर्वीच जाहीर केले आहे. तर भारतातील आपला स्मार्ट फोन्सचा व्यवसाय गुंडाळल्याने २,८०० कर्मचाऱ्यांना घरी बसविले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division