जिओ पेमेंट बँकला आरबीआयकडून मंजुरी

Jio Payment Bankरिलायन्स जिओ सिमकार्डच्या मोफत सेवेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आणखी एक यश संपादन केले आहे. स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जिओ पेमेंट बँकेला रिझर्व्ह बँकेचा हिरवा कंदील मिळाला आहे. ‘लाईव्ह मिंट’च्या वृत्तानुसार रिझर्व्ह बँकेने जिओ पेमेंट बँकेला अंतिम मंजुरी दिली आहे.

स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेली रिलायन्स जिओ पेमेंट बँक लवकरच सुरू होणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. आरआयएलच्या ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ने नुकताच १० कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला आहे. जिओ पेमेंट बँकेच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ग्राहकांसाठी नवनवीन योजना जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. कंपनीला अधिकाधिक महसूल मिळावा, हा त्यामागील हेतू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division