‘इमामी’ची ३५० कोटींची गुंतवणूक
बांधकाम क्षेत्रातील इमामी समूह आणि शेठ कॉर्प यांनी मॉंटाना या मुंबईतील मुलुंडमधील पहिल्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. पूर्व भारतात कार्यरत असलेल्या इमामीचे बांधकाम क्षेत्रातील अंग असलेल्या ‘इमामी इन्फ्रास्ट्रक्चर’ तसेच आलिशान आणि मध्यम घरनिर्मितीतील शेठ कॉर्पबरोबर या गृह प्रकल्पासाठी प्रत्येकी ५० टक्के भागीदारी असेल.
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वास्तुविशारद जेम्स लॉ यांनी या प्रकल्पासाठी रचनात्मक कौशल्य सादर केले आहे तर अंतर्गत आरेखनात जागतिक स्तरावर नावाजलेल्या एचबीए, सिंगापूरद्वारा सहकार्य लाभले आहे.