जनता सहकारी बॅंकेतर्फे सामाजिक संस्थांना आर्थिक मदत

महापौर आणि उपमहापौर यांच्या हस्ते देणगीचे वाटप

JSB Donation Photo 2व्यावसायिकता जपत असतानाच समाजऋण फेडण्याचा वारसा जनता सहकारी बँकेने आजपर्यंत जपला आहे. याचाच एक भाग म्हणून बॅंकेच्या वतीने पुणे, ठाणे, नाशिक आणि रत्नागिरी येथील एकूण बारा सेवाभावी संस्थांना तीस लाख रुपयांचा निधी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर, रा. स्व. संघ महानगर संघचालक रवींद्रजी वंजारवाडकर, संचालक मंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

हा तीस लाखांचा निधी सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, राष्ट्रीय सेवा समिती रत्नागिरी, ज्ञानदा प्रतिष्ठान, स्वरूपविर्धिनी, कै. वामनराव ओक रक्तपेढी ठाणे, श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे, कोअर संचालिका अंकुर विद्यामंदिर, धर्मजागरण ट्रस्ट, प्राथमिक शिक्षक मंडळ शिक्षण संस्था व महात्मा फुले वस्तू संग्रहालय यांना प्रदान करण्यात आला.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division