'गर्जे मराठी'चे प्रकाशन

garje marathi1भारत आज "लॅण्ड ऑफ आयडियाज' म्हणून ओळखला जातो; पण त्याची आपण "लॅण्ड ऑफ ऑपॉर्च्यूनिटीज' अशी ओळख निर्माण केली पाहिजे. आजचं जगाला तारू शकेल असं समीकरण कोणतं तर ते शिक्षण, चांगलं भिवष्य आणि संधी असं आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करा अपार मेहनतीला पर्याय नाही असा यशाचा गुरूमंत्रच पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी "गर्जे मराठी' या पुस्तक प्रकाशन समारंभी दिला.

"ग्रंथाली' प्रकाशनाने प्रकाशित केलेला आनंद आणि सुनीता गानू लिखित "गर्जे मराठी' या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. स्वा. सावरकर स्मारकात डॉ. माशेलकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राची पताका आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवणाऱ्या उद्योग, शिक्षण, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांतल्या 33 प्रितभाशाली व्यक्तिमत्त्वांची यशोगाथा सांगणाऱ्या "गर्जे मराठी' या इंग्रजी पुस्तकाचा "ग्रंथाली'ने प्रकाशित केलेल्या आणि सुनीता व आनंद गानू लिखित या पुस्तकाच्या निर्मितीचा वर्षभराचा प्रवास अत्यंत रोचक आहे असे नमूद केले. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रंगलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याची सुरुवात मराठी अभिमान गीत आणि या पुस्तकातील 33 मान्यवरांचा परिचय करून देणाऱ्या ध्वनिचित्रफितींनी झाली. लो. टिळकांच्या स्मृतीला अभिवादन करत महाराष्ट्राच्या बुद्धिमत्तेचं प्रतीक असणारी पगडी, उपरणं, पुस्तकं देऊन या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

"ग्रंथाली'चे विश्वस्त धनंजय गांगल यांनी आपल्या अनौपचारिक मनोगतातून गेल्या 40 वर्षांपासून वाचनसंस्कृती घडवणाऱ्या, चळवळ उभ्या करणाऱ्या "ग्रंथाली'चा प्रवास नेमक्या शब्दांत मांडला. लेखक आनंद आणि सुनीता गानू यांनी या मान्यवरांना शब्दबद्ध करण्याचा अनुभव मांडत यशस्वी महिलांसंदर्भातल्या पुस्तकाची आवृत्ती येत्या 8 मार्चला प्रकाशित करण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं "गर्जे मराठी' हे पुस्तक "ग्रंथाली'चे आधारस्तंभ, मार्गदर्शक स्व. एकनाथ ठाकूर यांना अर्पण करण्यात आलं आहे. "ग्रंथाली'चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी स्व. एकनाथ ठाकूर यांना हे पुस्तक समिर्पत करत "ग्रंथाली'शी संबंधित तीन महत्त्वाच्या व्यक्तींच्या सत्कारामागची आपली भूमिका मांडली. "ग्रंथाली'चे संस्थापक आणि ज्यांनी "ग्रंथाली' चळवळ निर्माण केली ते श्री. दिनकर गांगल, श्रीमती अनुराधा ठाकूर आणि "ग्रंथाली'शी अनेक वर्षांचं मैत्र असलेले पुस्तक छपाईच्या क्षेत्रातलं महत्त्वाचं नाव श्री. आनंद लिमये यांचा सत्कार डॉ. माशेलकरांच्या हस्ते करण्यात आला. पुस्तकात सहभागी असलेल्या 33 जणांपैकी उपस्थितीत 13 जणांनी - डॉ. दिनेश केसकर, डॉ. विजय जोशी, डॉ. अजय राणे, श्री. अरुण जोशी, डॉ. मंदार बिच्चू, श्री. हर्षवर्धन भावे, श्री. रवींद्र नेने, श्रीमती नंदिनी नेने, श्री. अमित वायकर, श्री. नंदकुमार ढेकणे, श्री. प्रशांत खरवडकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या मनोगतात "गर्जे मराठी' या पुस्तकाची मराठी आवृत्ती निघावी अशी इच्छा प्रदिर्शत करत यशाची शिखरं गाठणारी तरुण पिढी निर्माण होण्यासाठी या वाटेवरून प्रवास केलेल्या सर्वांनीच या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी "वेळ' दिला पाहिजे, हे नमूद केले.

या प्रकाशन समारंभात विविध स्तरांतील मान्यवर मंडळी उपस्थित होती. "गर्जे मराठी' या पुस्तकाची मराठी आवृत्ती 25 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिद्ध होईल, असे "ग्रंथाली'तर्फे सुदेश हिंगलासपूरकर यांनी सांगितले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division