अनिवासी भारतीयांचे ‘पीपीएफ’ बंद

PPFटपाल विभागाच्या अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक सुरू असताना संबंधित भारतीय नागरिक ’एनआरआय’ झाल्यास त्याला या योजनांचे लाभ मिळू शकणार नाहीत. अल्पबचत योजनांपैकी पीपीएफ व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) यांची खाती भारतीय नागरिक अनिवासी झाल्यावर बंद केली जातील व त्यावर केवळ चार टक्केच व्याज दिले जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे.

भारतीय व्यक्ती अनिवासी झाल्यानंतर तिचा या देशातील गुंतवणुकांशी संबंध कमी होतो. त्यामुळे सरकारने अल्पबचत योजनांपैकी पीपीएफ व एनएसी या योजना त्या व्यक्तीसाठी यापुढे उपलब्ध होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. नागरिक एनआरआय झाल्यानंतर ही दोन्ही खाती सरकारतर्फे बंद केली जातील. या दोन्ही खात्यांवर सध्या मिळणारा व्याजदर मात्र संबंधित एनआरआयला मिळणार नाही. त्याला पोस्टाच्या बचत खात्यावर दिला जाणारा चार टक्के व्याजदरच पीपीएफ व एनएससी वर दिला जाईल, असेही सरकारने सांगितले आहे.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) कायदा, १९६८ मधील सुधारणांनुसार या योजनेअंतर्गत कोणीही भारतीय व्यक्ती भविष्यनिर्वाह निधी साठवू शकते. मात्र जर अशा व्यक्तीने अनिवासी भारतीय अशी ओळख घेतल्यास हे खाते बंद होणार आहे. अनिवासी भारतीय ही ओळख तयार झाल्या दिवसापासून पीपीएफवर सध्या मिळणारे ७.८ टक्के व्याज मिळणार नाही. त्याऐवजी चार टक्के व्याज दिले जाईल. हे व्याज पीपीएफ खाते बंद केले जाणाऱ्या महिन्याच्या मागील महिन्यापासून दिले जाईल. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने राजपत्रात अंतर्भूत केली आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राविषयी वेगळी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division