गोदरेज अप्लायन्सेसची २०० कोटींची गुंतवणूक

godrejगोदरेज अप्लायन्सेसने शिरवळ उत्पादन प्रकल्पाची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. या नव्या गुंतवणुकीमुळे गोदरेज अप्लायन्सेसची क्षमताविस्तारातील एकूण गुंतवणूक ४०० कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे. गेल्या वर्षी, गोदरेज अप्लायन्सेसने २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून मोहाली प्रकल्पामध्ये काम सुरू केले होते. २०१९ च्या अखेरीस कार्यान्वित होणारी नवी फॅक्टुरी शेड एकूण १.६ लाख चौरस फूट क्षेत्रात असणार आहे व अंदाजे तीन लाख हाय एंड फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर, तीन लाख पूर्णतः ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन, एक लाख ऊर्जाक्षम चेस्ट फ्रीझर व पेटंटेड शुअरचिल तंत्रज्ञान असलेले पन्नास लाख मेडिकल रेफ्रिजरेटर अशा प्रीमिअम उत्पादनांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करणार आहे. यामुळे गोदरेज अप्लायन्सेसची शिरवळ व मोहाली या दोन्ही उत्पादन प्रकल्पांतील एकूण उत्पादनक्षमता वार्षिक अंदाजे ४६ लाख युनिटपर्यंत वाढणार आहे. यामुळे ४०० लोकांसाठी अतिरिक्त रोजगार निर्माण होणार आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवसायप्रमुख कमल नंदी यांनी म्हटले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division