कोकण भूमी प्रतिष्ठानने आयोजित केला, ग्लोबल कोकण महोत्सव

konkanकोकण भूमी प्रतिष्ठानने नुकत्याच आयोजित केलेल्या सहाव्या ग्लोबल कोकण महोत्सवात ‘मेक इन कोकण’ परिषदेचे आयोजन केले होते., ७ जानेवारी रोजी सिडको एग्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित या परिषदेचं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं. मेक इन इंडिया मोहीम व एमटीडीसी हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. या परिषदेत शेती विकास, आयुष उद्योग संधी आणि बँक वित्तपुरवठा या विषयांवर चर्चा आयोजित करण्यात आली. तरुणांनी कोकणात उद्योग करण्यास प्रेरित व्हावे यासाठी ग्लोबल कोकणतर्फे ‘स्टार्टअप कोकण’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.