नवं वर्षं वाहन उद्योगांसाठी अनुकूल नसल्याचा तज्ञांचा अंदाज-

carsवाहन उद्योगात नव्या वर्षात रोजगारमंदी येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या क्षेत्रातील रोजगार गेल्या वर्षीच्या मानाने दोन ते २.५ टक्के कमी होईल. २०१७मध्ये या क्षेत्रात रोजगारांच्या संधींमध्ये तीन ते ३.५ टक्के वाढ झाली होती. वाहन उद्योगात झपाट्याने येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

यासंदर्भात फिक्की, नॅसकॉम व अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) यांनी संयुक्त सर्वेक्षण केले आहे. ‘फ्युचर जॉब्ज इन इंडिया अ २०२२ पर्स्पेक्टिव्ह’ या अहवालानुसार विविध उद्योगक्षेत्रात रोजगाराच्या पारंपरिक संधी आक्रसणार आहेत. यावर मात करण्यासाठी पारंपरिक कौशल्यांची कास न धरता नवी कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. सध्या वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणावर स्वयंचालन (ऑटोमेशन) होत आहे. त्याचप्रमाणे कारची निर्मिती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होत असल्यामुळे याला अनुकूल अशी कौशल्य आत्मसात केल्यासच रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.