इलेक्ट्रॉनिक वेबिल सुविधा १ फेब्रुवारीपासून

gstजीएसटी अंतर्गत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालाची वाहतूक करताना मालवाहतूकदाराला जवळ बाळगाव्या लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वेबिल अर्थात ई-वे बिल ही सुविधा १ फेब्रुवारीपासून सरकार लागू करणार आहे. यामुळे करचुकवेगिरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसून कर महसुलात २० टक्के वाढ होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

जीएसटी १ जुले २०१७पासून लागू झाल्यानंतर मालवाहतूकदारांसाठी ई-वे बिल पद्धत लागू करणे केवळ नेटवर्क तयार नसल्यामुळे लांबणीवर पडत गेले होते. मात्र जीएसटी प्रत्यक्ष लागू होण्याआधी १७ राज्यांत याची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक चालान पद्धत चांगल्या प्रकारे राबवली गेली होती. परंतु संपूर्ण देशभरात ही पद्धत राबवण्यासाठी त्यावेळी नेटवर्क तयार नव्हते. ते आता तयार झाले असल्यामुळे १ फेब्रुवारीपासून ई-वे बिल पद्धत लागू होणार आहे

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division