नॅसकॉम’च्या अध्यक्षपदी देवयानी घोष यांची निवड

2Devyani Ghoshमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची (आयटी) शिखर संघटना असलेल्या ‘नॅसकॉम’च्या अध्यक्षपदी ‘इंटेल कॉर्पोरेशन’च्या दक्षिण आशिया विभागाच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका असलेल्या देवयानी घोष यांची निवड झाली आहे.एप्रिलमध्ये घोष ‘नॅसकॉम’चीसूत्रे स्वीकारतील. ‘नॅसकॉम’च्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. पुरुषांची मक्तेूदारी असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लिंगभेद नष्ट करून महिलांना समान स्थान देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. घोष यांनी तब्बल २० वर्षे ‘इंटेल कॉर्पोरेशन’मध्ये विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. जागतिक बाजारापेठेतील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ‘नॅसकॉम’ची भूमिका त्यांच्या कार्यकाळात निर्णायक ठरणार आहे. महिला कर्मचाऱ्यांची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्ययक असल्याचे घोष यांनी म्हटले आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात सुमारे ४० लाख कुशल मनुष्यबळ असून, त्यापैकी एक तृतीयांश महिला आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division